आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐकावे ते नवलच! मुलाची दाढी काढण्यासाठी बिल्डरने दिली ग्रॅंड पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपण यापूर्वी वाढदिवस, जावळाचा, नामकरण समारंभ हे धुमधडाक्यात साजरे केलेले पाहिलेले असतील पण मुंबईजवळील दिवा भागातील एका बिल्डर पित्याने आपल्या मुलासाठी अनोखे सेलिब्रेशन ठेवले. ठाण्यातील वेगाने विकसित होणारे उपनगर म्हणून उदयास आलेल्या दिवा येथील बिल्डर जितेंद्र भगत यांनी आपल्या 17 वर्षाच्या मुलाचा प्रथम दाढी काढण्याचा समारंभ ठेवला. यासाठी पिता व त्याच्या कुटुंबियांनी संपूर्ण शहरभर होर्डिंग्ज लावले. एवढेच नव्हे तर पार्टीत डीजे, दारू-कबाबसारखी बडदास्त ठेवून शेकडो लोकांसमवेत जोरदार पार्टी साजरी केली. आता या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ठाण्यातील बिल्डर जितेंद्र भगत यांचा मुलगा दीप याचा नुकताच 22 मे 17 वा वाढदिवस होता. आपल्या एकुलत्या एक मुलाचा 17 वा वाढदिवस यादगार व्हावा यासाठी 'प्रथम दाढी समारंभ' करण्याचा निर्णय घेतला. यासाठी संपूर्ण दिवा शहरात होर्डिंग्ज लावून आपल्या शेकडो मित्रमंडळींना याचे विशेष आमंत्रण दिले.
शेकडो लोकांच्या उपस्थितीत केली दाढी- सायंकाळी साडेसात-आठच्या सुमारास शेकडो लोक जमले असताना सर्वासमोर दीप भगतची पहिल्यांदाच दाढी करण्यात आली. त्यावेळी उपस्थित लोक बुचकळ्यात पडले. हा काय समारंभ आहे काय अशीही काहींनी प्रतिक्रिया दिली. मात्र, नातेसंबंध व भगत यांची प्रतिष्ठा पाहून शेकडो लोक यात सहभागी झाले. याचसोबत भगत यांनी नॉन व्हेज, दारूपासून सर्वच पदार्थांची रेलचेल ठेवली होती.
पुढे पाहा यासंबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...