आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहिसरमध्ये इमारत कोसळून पाच ठार, नऊ जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंब्रा येथील इमारत कोसळून 24 तास उलटत नाही तोच दहिसरमध्ये चार मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत पाच जण ठार झाले असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

दहिसर पूर्व भागातील तावडे रोडवरची ही इमारत होती. सुदैवाने इमारत आधीच रिकामी करण्यात आली होती. बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून ढिगारा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहेत. ढिगार्‍याखालून प्रमोद प्रजापती यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

‍ढिगार्‍याखाली अजून चार जण अडकल्याच‍ी भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, मुब्रा येथे गुरुवारी मध्यरात्री ‘स्मृती’ ही तीनमजली इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने 21 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. ही इमारत पालिकेच्या धोकादायक यादीमध्ये होती.


तळेगाव (पुणे) येथून राष्‍ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) दोन तासांत पोहोचले. सकाळी पाऊसही नव्हता. त्यामुळे बचावकार्यात अडचणी आल्या नाहीत. 1979 मध्ये बांधलेल्या या इमारतीचे विकासक बाळाराम म्हात्रे आहेत. या इमारतीमध्ये 9 कुटुंबे वास्तव्यास होती. ठाणे महापालिकेने यापूर्वीच धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावली होती. त्यानंतर पहिल्या मजल्यावरून लोकांना हलवण्यात आले होते. 35 वर्षे जुन्या या इमारतीच्या दुरुस्तीचे काम रहिवासी हाती घेणार होते. त्यासाठी त्यांनी वर्गणी जमा केली होती. परंतु त्यापूर्वीच ही इमारत कोसळली.


सुदैवाने ते वाचले : तिस-या मजल्यावर रझी अहमद कादरी यांचे कुटुंब राहत होते. रात्री 2 वाजता स्लॅबमधून पाणी गळती होऊ लागताच ते जागे झाले. इमारत पडणार हे लक्षात येताच आठही सदस्यांनी बाहेर धाव घेतली. त्यानंतर दोनच मिनिटांत इमारत कोसळली.


यापूर्वीच्या दुर्घटना
4 एप्रिल 2013 : मुंब्य्रातील लकी इमारत कोसळून 74 जणांचा बळी
10 जून : माहीम परिसरात अल्ताफ मॅन्शन इमारत कोसळून 10 ठार.