आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई इमारत अपघातातील मृतांचा आकडा 11 वर, 22 जणांना काढले बाहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डॉकयार्ड रोड (पूर्व) परिसरात असलेल्या महापालिकेच्या वसाहतीतील (बीएमसी कॉलनी) एक पाच मजली इमारत आज (शुक्रवारी) सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास कोसळली. यात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत बीएमसीचे कर्मचारी राहत होते. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अनेक जण ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. आतापर्यंत 22 जखमींना बाहेर काढण्‍यात यश आले आहे. अनेक लहान मुलांनाही वाचविले आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी इमारत कोसळण्‍यामागे घातपाताचा संशय व्‍यक्त केला आहे. इमारत धोकादायक होती. परंतु, कोसळण्‍याच्‍या स्थितीत नव्‍हती. त्‍यामुळे इमारत पडण्‍यासाठी हेतूपरस्‍पर खिळखिळी तर केली नव्‍हती? याचा तपास करण्‍यात येणार असल्‍याचे कुंटे यांनी सांगितले.

मिळालेल्‍या माहितीनुसार, एका 12 वर्षीय मुलासह एक वरिष्‍ठ महिलेचा मृत्‍यू झाला आहे. नीला चावडा असे तिचे नाव आहे. बवाचकार्यात राष्‍ट्रीय आपात्‍कालीन बचाव प‍थकाचे जवान पोहोचले आहेत. त्‍यांनी 110 जण ढिगा-याखाली अडकल्‍याची भीती व्‍यक्त केली आहे.

या इमारतीत तीस ते चाळीस कुटुंबे राहत होती. ती ढिगा-याखाली दबल्‍या गेली आहेत. बचाव पथकांनी 5 जणांना बाहेर काढले होते. मात्र, काही जणांचा मृत्‍यू झाला असल्‍याची भीती व्‍यक्त करण्‍यात येत आहे. जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या दुर्घटनेची दखल घेतली असून त्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्य सचिव आणि आत्पातकानीन व्यवस्थापन अधिकारी बैठकीस उपस्थित झाले आहेत.