आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत इमारत कोसळून 6 जणांचा मृत्‍यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मान्‍सूनच्‍या पहिल्‍याच पावसाने मुंबईला दणका दिला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्‍त्‍यांचे तलाव झाले. तर माहिममध्‍ये एक 6 मजली इमारत कोसळल्‍यामुळे सहा जणांचा मृत्‍यू झाला आहे. याशिवाय 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या इमारतीमध्‍ये अभिनेता संजय दत्तचे वकील रिझवान मर्चंट यांचे कुटुंबिय अडकले असल्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे.

मुंबई गेल्‍या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्‍यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. लोकल रेल्‍वे वाहतूकही पुर्णपणे विस्‍कळीत झाली होती. त्‍यातच माहिममध्‍ये केडेल रोड भागात सोमवारी रात्री इमारत कोसळली. त्‍यात चौघांचा जागीच मृत्‍यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.

इमारतीच्‍या तळमजल्‍यावर दुरुस्‍तीचे काम सुरु होते. त्‍याचवेळी काही भाग कोसळला. मृतांमध्ये जैबुन्निसा अब्दुल सत्तार लाखा (वय 76) या वृद्धेचा समावेश आहे. इतरांची ओळख अद्याप पटलेली नाही. अगिनशमन विभागच्‍या जवानांनी घटनास्‍थळी बचावकार्य सुरु केले. सकाळीही ढिगारा उपसण्‍याचे काम सुरु होते. जखमींना केईएम आणि सायन रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.