आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंबवलीत इमारत कोसळली; नऊ ठार तर अजूनही 20 जण ढिगा-या खाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोसळलेली इमारत. - Divya Marathi
कोसळलेली इमारत.
ठाणे – डोंबबिवलीच्या ठाकुर्ली परिसरात चोळेगावातील 'मातृकृपा' ही चार मजली इमारत मंगळवारी रात्री 11:30 वाजताच्‍या सुमारास कोसळली. यात नऊ जण ठार झालेत. दरम्‍यान, आतापर्यंत १५ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, अजूनही ढिगाऱ्याखाली काही रहिवासी अडकले असण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
स्‍थलांतराच्‍या सूचनेकडे केले दुर्लक्ष
ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केलेली होती. दुपारी इमारतीचा काही भाग कोसळला, त्यावेळी रहिवाशांना दुसरीकडे स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. या इमारतीमध्‍ये तब्‍बल 20 कुटुंब राहत होते.
जीनाच ढासाळल्‍याने लोक अडकले
इमारतीमध्‍ये राहणा-या बाळा गणेश यांनी सांगितले, रात्री 11 वाजताच्‍या सुमारास मुसळधार पाऊस पडत होता. दरम्‍यान, अचानक मोठा आवाज झाला. कळाले इमारतीचा जिनाच ढासाळला. त्‍यामुळे इमारतीमध्‍ये रहिवाशी अडकून पकडले. त्‍यांना बाहेरपडणे अशक्‍य झाले. थोड्या वेळाने पूर्ण इमारतच कोसळली.
मदत कार्यात अडचण
या परिसरातील रस्‍ते अरुंद आहेत. त्‍यामुळे फायर ब्रिगेडला घटनास्‍थळी कसरत करून पोहोचावे लागले. दरम्‍यान, त्‍यातच मुसळधार पाऊस पडत होता. त्‍यामुळे मदत कार्यास अडचण निर्माण झाली होती.
पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटो...