भिवंडीत दुमजली इमारत / भिवंडीत दुमजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, 7 जणांना ढिगार्‍याखालून काढले

Dec 29,2015 01:03:00 PM IST
ठाणे- भिवंडीत भुईवाडा परिसरातील पोलिस स्टेशनमागील दुमजली इमारत मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला आहे. ढिगार्‍याखालून 7 जणांना बाहेर काढण्यात आले असून एक जण ‍ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. मृताच्या वारसाला 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्‍यात आली आहे.

भिवंडीच्या तांडेल मोहल्ला ही इमारत होती. इमारत कशी कोसळण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरु असून जखमींना इंदिरा गांधी रुग्णालयात उपाचारासाठी हलवण्यात आले आहे. अस्तक बेग, परवेश बेग व अनवर बेग याचे कुटुंबीय या इमारतीत राहात होते.
X