आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली, अाठ ठार, आठ दिवसातली दुसरी दुर्घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भिवंडीतीलगैबीनगर परिसरात इमारत काेसळून अाठ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला अाठवडा उलटत नाही ताेच हनुमान टेकडी परिसरात रविवारी सकाळी सात वाजता अाणखी एक दुमजली इमारत काेसळून पुन्हा अाठ जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन जवानांनी दिवसभर शर्थीचे प्रयत्न करून अाधी तीन दुपारनंतर पाच मृतदेह बाहेर काढले. या दुर्घटनेमुळे या भागातील अतिधाेकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा एेरणीवर अाला अाहे.

भिवंडीच्या हनुमान टेकडी परिसरात विनाेद साईजिंगजवळ असलेल्या ३५ वर्षे जुन्या अतिधाेकादायक दुमजली इमारतीमध्ये तीन कुटुंबे राहत हाेती. महापालिकेने ही इमारत धाेकादायक असल्याची दाेनदा नाेटीस दिल्यानंतरही या कुटुंबीयांनी घरे रिकामी केली नव्हती. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही जीर्ण इमारत खचून अचानक काेसळली. या दुर्घटनेमध्ये इमारतीचे मालक सज्जनलाल महादेव गुप्ता ( ६०) आणि त्यांची पत्नी सत्यवती सज्जनलाल गुप्ता यांच्यासह अाठ जणांचा मृत्यू झाला हाेता.

या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. ठाणे जिल्हाधिकारी आपत्ती नियंत्रण कक्षानेदेखील त्वरित एनडीआरएफच्या जवानांना पाचारण केले. तोपर्यंत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्याखालून चार जणांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. एनडीआरएफच्या जवानांनी उपलब्ध साधन सामग्री, श्वानपथक यांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांचा शोध सुरू केला हाेता. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरूच हाेते.

अतिधोकादायक इमारती रिकाम्या करणार
भिवंडीतील१७ अतिधोकादायक इमारतींपैकी सात इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले असून इतर इमारतींतील रहिवाशांना बाहेर हलविण्याची कारवाई तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात अाले. त्यासाठी महसूल विभाग आणि पोलिस यांचीही मदत घेतली जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...