आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेंडीबाजार इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 33 वर; 46 नागरिकांना वाचवण्यात यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भेंडीबाजार येथील हुसैनी इमारत दुर्घटनेचे  बचावकार्य शुक्रवारी २८ तासांनंतर थांबवण्यात आले. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या अथक प्रयत्नांनंतर ढिगाऱ्यातून ४६ जणांना बाहेर काढण्यात आले असून यात ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १३ जखमींपैकी १० जणांवर उपचार सुरू आहेत, तर तीन जणांना उपचार करून सोडण्यात आले. अग्निशमन दलातील सात जवान जखमी झाले होते. त्यातील पाच जणांवर उपचार करून घरी सोडले असून दोघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मृतांमध्ये २० दिवसांच्या बाळासह तीन वर्षांच्या दोन मुली आणि सहा वर्षांच्या एका मुलाचा समावेश आहे.   

भेंडीबाजारातील गजबजलेल्या पाकमोडिया स्ट्रीटवरील हुसैनी ही  ११७ वर्षांची जुनी पाचमजली इमारत सकाळी सव्वाआठच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या इमारतीच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमधील दुकाने व बाजूच्या गाळ्यांमध्ये तसेच केटरर्समध्ये काम करणारे कामगार राहत होते. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर पाच कुटुंबे वास्तव्यास होती. १२ खोल्या आणि २० गोदामे  या इमारतीत होती. धक्कादायक म्हणजे या इमारतीत सकाळी साडेनऊ वाजता नर्सरी भरणार हाेती. मात्र, त्याआधीच ही इमारत कोसळल्याने त्या चिमुकल्यांचे जीव वाचले. इमारत कोसळल्यानंतर बाजूच्या इमारतींना हादरा बसला आहे. त्यामुळे तडा गेलेल्या येथील तीन इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.  

दुर्घटनेची चौकशी होणार   
इमारत दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून चौकशीची जबाबदारी गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनाही दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.   

उडी घेतल्याने दोघे वाचले
रात्रपाळी करून अालेले इक्बाल अाणि सलीम तिसऱ्या मजल्यावरच हाेते. इमारत पडत असल्याची जाणीव हाेताच त्यांनी दरवाजा ताेडून तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. त्यामध्ये दाेघांच्या डाेक्याला किरकाेळ दुखापत झाली असून ते जे.जे. रुग्णालयात उपचार घेत अाहेत. महंमद म्हणाला की, नाेकरीच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुंबईत अालाे. ही इमारत १०० हून अधिक वर्षे जुनी अाहे हेदेखील मला माहिती नव्हते. अपघात झाल्यानंतर हे कळले.

ढिगाऱ्याखालून सुटका 51 जणांची सुटका
बहुसंख्य बोहरी समाज वास्तव्याला असलेला हा परिसर दाटीवाटीचा आहे. इमारतीशेजारी मिठाईची अनेक दुकाने होती, त्यामुळे ढिगाऱ्याखाली किमान 60 ते 65 लोक अडकले असण्याची भीती वर्तवण्यात येत होती. या सहामजली इमारतीत 10 सदनिका व 6 गोदामे होती. 5 कुटुंबे राहत हाेती, तर 5 कुटुंबे यापूर्वीच संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाली हाेती. 

मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत  
सरकारने मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त आयुक्तांमार्फत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. फडणवीस यांच्यासह गृहनिर्माण मंत्री प्रकश मेहता, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी घटनास्थळी भेट दिली. पालिका आयुक्त अजोय मेहता अाणि मुंबई शहर जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनीही घटनास्थळी जाऊन बचावकार्याचा आढावा घेतला.

इशारा टाळून पाच कुटुंबांचा निवास  
हुसेनी म्हाडाची उपकर प्राप्त इमारत असून 2011 मध्ये ती बोहरी धर्मगुरूंच्या पुढाकाराने स्थापन सैफी बुऱ्हानी ट्रस्टकडे पुनर्विकासासाठी दिली होती. म्हाडाने त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले हाेते. रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरेही उपलब्ध करून दिली होती. तरीसुद्धा 5 कुटुंबे इथेच राहत हाेती. दरम्यान, इमारती धोकादायक नव्हती, पालिकेने नोटीसही बजावली नव्हती, असे शेजारच्या हारून इमारतीमधील रहिवाशांनी सांगितले.
 
5 पॉईंट्‍समधून समजून घ्या हे प्रकरण...
1) हुसेनीवाला इमारत कुठे आहे?
- दक्षिण मुंबईतील जेजे मार्गावरील भेंडीबाजार परिसरात ही इमारत आहे. गुरुवारी सकाळी 8:30 इमारत कोसळली. इमारतीत 13 कुटुंबे राहात होती. इमारत 117 वर्षे जुनी होती.
- भेंडी बाजार हा मुस्लिम बहुल परिसर आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचे बालपण या भागात गेले आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीपासून जवळच दाऊदचे घर आहे. या भागातील बहुतांश इमारती जीर्ण झाल्या आहेत. येथील चिंचोळ्या गल्लीत नेहमी वर्दळ असते.

2) दुर्घटनेमागील कारण काय?
- स्थानिक लोकांनी दिलेली माहिती अशी की, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दुरुस्तीचे काम सुरु होते.
- दरम्यान, 2011 मध्ये बीएमसीने या इमारतीला धोकादायक ठरवले होते. नोटीसही बजावली होती. रिकनस्ट्रक्शन स्कीमच्या माध्यमातून इमारतीचे रेनोव्हेशनचे काम सुरु करण्‍यात येणार होते. काही कुटुंबानी घर रिकामे करून दुसरीकडे राहायला गेले होते.

3) किती नुकसान झाले?
- या दुर्घटनेत 34 जणांचा मृत्यू झाला असून 36 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. फायर बिग्रेड आणि  एनडीआरएफचे 6 कर्मचारी जखमी झाले आहेत. ढिगार्‍याखाली अजून काही लोक अडकले असल्याची शक्यता आहे. ढिगार्‍याखालील एका व्यक्तीने त्याच्या नातेवाईकांना फोन करून मदत मागिल्याची माहिती मिळाली आहे.

4) मुंबईत धोकादायक इमारती किती?
- बृहन्मुंबई महापालिकेने (बीएमसी) मुंबईतील 625 इमारतींना धोकादायक घोषित केले असून नोटीसही बजावल्या आहेत.

5) एका महिन्यात दूसरी दुर्घटना
- 26 जुलैला घाटकोपरमध्ये 4 मजली इमारत कोसळल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता.  
- ग्राउंड फ्लोअरवर हॉस्पिटलचे काम सुरु होते. ही इमारत धोकादायक असल्याचे महापालिकेने म्हटले होते.
 
मृताच्या वारसांना 5 लाखांची मदत - चंद्रकांत पाटील
- दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. दुर्घटनेत जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करेल, अशी घोषणा राज्याचे पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे केली.

काय म्हणाले गृहनिर्माण मंत्री...?
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता म्हणाले की, इमारत दुर्घटनेसाठी ट्रस्ट सरकार व महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे. सरकारने नैतिक जबाबदार स्वीकारली आहे. यापुढे कोणतीही दया न दाखवता धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना जबरदस्तीने खाली करण्यास भाग पाडणार आहे.

इमारत होती धोकादायक...
-  हुसेनीवाला ही इमारत धोकादायक होती. ती जीर्ण झाली होती. महापालिकेकडून तिला नोटीसही बजावण्यात आली होती. विशेष म्हणजे तीन मजली इमारतीवर दोन बेकायदेशीर मजले बांधण्यात आले होते अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांन‍ी दिली आहे. या घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले जातील असेही ते म्हणाले.

घाटकोपरमध्ये 17 जणांचा मृत्यू..
- 26 जुलैला घाटकोपरमध्ये 4 मजली इमारत कोसळल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता.  
- ग्राउंड फ्लोअरवर हॉस्पिटलचे काम सुरु होते. ही इमारत धोकादायक असल्याचे महापालिकेने म्हटले होते.
- महापालिकेनुसार मुंबईत सध्या 617 इमारती जीर्ण झाल्या आहेत. अनेक इमारती पाडण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. इमारतींच्या बाहेर नोटिसही चिटकवण्यात आल्या आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, दुर्घटनेची भीषणता दर्शवणारे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...