आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडी शर्यत हा क्रूर खेळ; अधिसुचनेला हायकोर्टात आव्हान, बंदीनंतर अशी मिळाली मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य शासनाने बैलगाडी शर्यतसाठी काढलेल्या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. बैलगाडी शर्यत हा अत्यंत क्रूर खेळ प्रकार आहे, अशा आशायाची याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. अजय मराठे यांनी ही याचिका दाखल केली आहे.
बैलगाडी शर्तय हा क्रूर खेळ प्रकार असल्याचे मराठे यांनी याचिकेत म्हटले आहे. माणसांचा खेळ पण बैलांनाचे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. बैल हा धावण्यासाठी नाही तर कष्टाची कामे करण्यासाठी आहे, असेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

दरम्यान, बैलगाडी शर्यतवरील बंदी राज्य शासनाने उठवली आहे. शासनाने संमत केलेल्या बैलगाडा शर्यतच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून विधेयकास कायदेशीर मान्यता मिळाली आहे.

नियम व अटी लागू...
बैलगाडी शर्यत आयोजित करण्‍यासाठी नियम व अटही ठेवण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने कोर्टात सांगितले होते. यासाठी जिल्हाधिकार्‍यांची परवानगी आवश्यक राहणार आहे.   पशुसंवर्धन विभाग यासंबंधीची अधिसूचना लवकरच काढणार आहे.

पुढील स्लाइडवर वाचा... जलीकट्टूच्या धर्तीवर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू, शिवसेनेच्या या खासदाराने केला होता पाठपुरावा...
बातम्या आणखी आहेत...