आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडा शर्यतींवर पुन्हा बंदी; राज्य सरकारचा अध्यादेश मुंबई हायकोर्टाने केला रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैलगाडा शर्यती म्हणजे प्राण्यांवर क्रूरता - याचिकाकर्ते - Divya Marathi
बैलगाडा शर्यती म्हणजे प्राण्यांवर क्रूरता - याचिकाकर्ते
मुंबई - राज्य सरकारने बैलगाडा शर्यतींचे खेळ प्रकार सुरू ठेवण्यावर काढलेला अध्यादेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे, यावर्षी कुठल्याही ठिकाणी बैलगाडा शर्यती होणार नाहीत. सरकारने बंदी उठवण्याच्या अध्यादेश विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. हायकोर्टाने त्या याचिकेच्या समर्थनात बुधवारी आपला निकाल जाहीर केला आहे. 
 
 
- बैलगाडा शर्यतीवर असलेली बंदी राज्य सरकारने नुकतीच उठ​वली. आदेशाला आव्हान देणारी याचिका अजय मराठे यांनी केली होती. 
- बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ असून त्यात बैलांना इजा होत असल्याचे अर्जदाराचे म्हणणे होते. बैल हा धावण्यासाठी नव्हे तर शेतीची कामे करण्यासाठी असलेला प्राणी असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी मांडला.
- एवढेच नव्हे, तर बैल हे शेतात काम करण्यासाठी असतात त्यांच्याकडून शर्यतीचे क्रीडा प्रकार करून घेणे ही क्रूरता असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे.
- मुंबई हायकोर्टाने बैलगाडी स्पर्धेला घातलेल्या बंदीला राज्य सरकारने आव्हान दिले नव्हते. याचाच अर्थ राज्य सरकार बैलगाडी स्पर्धा बंदीच्या बाजूने असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. 
- सुप्रीम कोर्टानेही बैलगाडी स्पर्धा हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ नसल्याचे म्हटले होते. तसा उल्लेखही मराठे यांनी आपल्या याचिकेत केला आहे.
बातम्या आणखी आहेत...