आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जमादार माेरेंच्या अाग्रहामुळेच राजभवनातील प्राचीन खंदकाचा लागला शाेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राजभवनातील सुमारे दीडशे वर्षे जुन्या खंदकाचा मंगळवारी शाेध लागला. या खंदकाची माहिती राज्यपालांना नेमकी कुणी दिली असेल? यावरून चर्चा सुरू आहे. गेली ३८ वर्षे राजभवनात सेवा बजावणाऱ्या वसंत मोरे यांनी हे खंदक नेमके कुठे अाहे ही माहिती राज्यपालांनी दिली आणि त्याची दखल घेत इतिहासप्रेमी राज्यपालांनी या खंदकाच्या समाेरील भिंत पाडण्याचे अादेश दिले. राजभवनाच्या इतिहासाचे जाणकार अाणि आजवरच्या विविध राज्यपालांसह सर्वाधिक हवाई प्रवास केलेली व्यक्ती म्हणून जमादार या चतुर्थ श्रेणीतील पदावर असले तरी मोरे यांना राजभवनात आदराचे स्थान आहे.

राजभवन समुद्रकिनाऱ्यावर आहे. हा किनारा आणि राज्यपालांचे घरादरम्यानची हिरवळ संपून सर्वात जुन्या जलचिंतन इमारतीच्या खाली समुद्राकडे एक पायऱ्यंाची वाट जाते. खाली उतरल्यावर विटांच्या भिंत दिसते आणि त्याच्या थोड्या समोर दगडी भिंतही दिसत होती. सापांच्या भीतीमुळे गेली १० वर्षे ही वाट बंदच होती. मात्र त्यापूर्वीच्या राज्यपालांच्या पाठिमागे फिरताना मोरे यांना या दोन्ही भिंती नेहमीच गूढ वाटायच्या. मोरे यंाचे वडील रामचंद्र मोरे हे सुद्धा राजभवनातच सेवेला होते. त्यामुळे जन्मापासूनच मोरे हे इथेच वाढले आणि नंतर नोकरीला लागले. वडिलांकडून त्यांनी राजभवनच्या खाली भूयार असल्याचे ऐकले होते.

राजभवनातील या हिरवळीवर रोज राज्यपाल सी. विद्यासागर राव मॉर्निंग वॉक घेतात. राजभवनाखाली भूयार आहे, ते शोधले जावे, ही कळकळ माेरेंनी त्यांना अनेकदा बाेलून दाखवली. राज्यपालंाचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याकडेही पाठपुरावा केला. मग काशीकरांनाही राज्यपालांकडे पाठपुरावा केला. इतिहासप्रेमी राव हे तर या माहितीने खूप अानंदी झाले. त्यंानी प्रशासनाला भूयार शोधण्याच्या सूचना केल्या. प्रशासनाने सुरक्षेचे कारण देत तीन महिने टाळाटाळ केली. मात्र १२ ऑगस्ट रोजी राज्यपालांनी विटंाची भिंत तोडण्याचे आदेश दिले अाणि िहरवळीच्याच खाली दोन मजली खंदक असल्याचा शोध लागला.

राज्यपालांच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाच्या सफारीत वसंत मोरे नेहमीच दिसतात. राज्यपालांना काय हवे काय नको असे बघण्याची जबाबदारी असलेल्या माेरेंना वाचनाची खूप आवड आहे. शिक्षण फार नसले तरी ते उत्तम इंग्रजी बोलतात. राजभवनात येणारे विविध मान्यवर व पंतप्रधांशीही ते इंग्रजीत संवाद साधतात. मोरे यांना माध्यमांशी बोलण्याची परवानगी नसल्याने त्यांनी याविषयी काहीही बोलण्यास व स्वत:चे छायाचित्र घेऊ देण्यास नकार दिला.

जॅकी श्रॉफचा बालमित्र
चित्रपट अभिनेता जॅकी श्रॉफ याचे बालपणही वाळकेश्वरमध्ये गेले. त्या काळात राजभवनात इतकी सुरक्षा नसायची. त्यामुळे राजभवन परिसरात जॅकी अाणि वसंत मोरे सोबत खेळले. राजभवनात काही खास कार्यक्रमांना निमंत्रित पाहुणा म्हणून जॅकी येतो, तेव्हा तो मोरे यांना मिठी मारतो आणि ‘हा माझा बालमित्र’ असे राज्यपालांनाही अावर्जून सांगताे, अशी अाठवण जनसंपर्क अधिकारी असलेले उमेश काशीकर यांनी सांगितली.

इतिहासप्रेमी राज्यपाल
राज्यपाल राव यांचे इतिहास आणि ऐतिहासिक वारसा जपण्यावर फार प्रेम आहे. त्यांच्या घरासमोरील आणि भोजन कक्षाच्या बाजूच्या मोकळ्या जागेतच उभे राहून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण करत राज्य स्थापनेची अधिकृत प्रक्रिया पूर्ण केली हाेती, असे राव यांना गेल्या वर्षी काेणीतरी सांगितले हाेते. त्या वेळी या जागेवर कचरा पडलेला असल्याचे राव यांना दिसले. त्यांनी तत्काळ आदेश देत या जागेवर दीडशे फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारून घेतला अाणि त्याच्या बाजूला महाराष्ट्राचा नकाशा कोरलेला फलक बसवला, या जागेची उत्तम सजावटही करून घेतली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, फोटो...
बातम्या आणखी आहेत...