मुंबई - जगभरातील दाऊदी बोहरा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सय्यदना डॉ.मुहंमद बुऱ्हानुद्दीन यांचा पहिला स्मृतिदनि ६ जानेवारीला होणार आहे. सात दविस मुंबईच्या दाऊदी बोहरा समाजाच्या मुख्य दर्ग्यात चालणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून जगभरातून पाच लाख लोक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.
जगभरातील दाऊदी बोहरा समाजाचे ५२ वे धर्मगुरू असलेल्या सय्यदना डॉ.मुहंमद बुऱ्हानुद्दीन यांचे गेल्या वर्षी वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या निधानंतर मुंबईतील अंत्ययात्रेला उसळलेल्या जनसागरात चेंगराचेंगरी होऊन काही जणांचा मृत्यू झाला होता. ही बाब लक्षात घेऊन यंदा त्यांच्या पहिल्या स्मृतिदनिानिमित्त समाजाच्या वतीने चोख व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सात दविस चालणारा हा कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई पोलिस आणि फायर ब्रिगेड यांच्याशी चर्चा करून बोहरा समाजाच्या वतीने एक आराखडा तयार करण्यात आला आहे. १ ते ३ जानेवारी या तीन दविसांत दर्शनासाठी आतापर्यंत किमान पन्नास हजार लोकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तसेच ४ ते ७ जानेवारीदरम्यान दर तासाला किमान १२०० लोक कबरीचे दर्शन घेतील, अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दाऊदी बोहरा समितीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कुरेश रघीब यांनी दिली आहे. त्यासाठी मशिदीची चारही प्रवेशद्वारे खुली केली जातील. एकही व्यक्ती दर्शनापासून वंचित राहू नये, असे आदेश सध्याचे सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी दिल्याचेही रघीब म्हणाले. हा समाज ज्या प्रमुख सात देशांमध्ये मोठ्या संख्येने आहे त्या देशांतील लोकांना दर्शनासाठी वेळेवर मुंबईत येता यावे म्हणून वनिाविलंब व्हिसा देण्यात यावा यासाठी दूतावासांना वनिंतीपत्र धाडण्यात आल्याची माहिती कुरेश रघीब यांनी दिली.
ऑनलाइन नाेंदणी
सय्यदनांच्या दर्शनासाठी एक ऑनलाइन रजिस्ट्रेशन सिस्टिम विकसित करण्यात आली आहे. या माध्यमातून समन्वय समितीमार्फत लोकांशी संपर्क साधला जात असून त्यांना सोयीस्कर अशी तारीख आणि वेळ देण्यात येत आहे. १ ते ७ जानेवारी असे सात दविस २४ तास दर्शनासाठी खुले ठेवले आहे.