आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयाच्या आगीची वर्षपूर्ती, जानेवारीपर्यंत नूतनीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या वर्षी 21 जून रोजी मंत्रालयाला आग लागली होती त्या घटनेला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. आगीनंतर नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. ते अजूनही काम अर्धवटच असून जानेवारीपर्यंत काम पूर्ण होईल, अशी शक्यता मंत्रालयातील वरिष्ठ अधिका-यांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केली.


मंत्रालयाच्या नूतनीकरणाचे काम युनिटी इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले आहे. 138 कोटी रुपये खर्चाचे हे काम अजूनही अर्धवट आहे. आर.सी.सी. बीम, कॉलम्स, स्लॅबच्या संरचनात्मक दुरुस्ती सुरूआहे. कोर्टयार्डमध्ये तीन मीटर रुंदीचा अतिरिक्त कॉरीडॉर बांधण्याचे काम सुरू आहे. पुन्हा आग लागल्यास पाण्याची कमतरता भासू नये म्हणून अग्निशामक यंत्रणेकरता उद्यानात जमिनीच्या खाली आठ मीटरवर नऊ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येत आहे. टेरेसवर 40 हजार लिटर पाण्याच्या टाक्या बांधण्यात येत आहेत. चौथ्या आणि पाचव्या मजल्याचे कामही अर्धवट स्थितीत आहे.