आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Burning Body Found Missing TCS Employee Esther Anusaya At Mumbai

सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीचा मृतदेह सापडला जळालेल्या अवस्थेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या 10-12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ईस्टर अनुसया या सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीचा मृतदेह काल सायंकाळी ईस्टर्न एक्स्प्रेस वेजवळील मिठागारात सापडला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून तो जाळून टाकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ईस्टर आपल्या मूळगावी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम येथे नाताळाच्या सुटीसाठी गेली होती. मात्र सुटीवरून परतत असताना कुर्ला स्थानकात उतरल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. लुटमार करून तिची टॅक्सीचालकांनी हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने तपास सुरू आहे.
याबाबतची माहिती अशी, की ईस्टर अनुसया मुंबईत टीसीएस या मल्टिनॅशनल कंपनीत गेल्या वर्षभरापासून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करीत आहे. अंधेरीतील एका महिला हॉस्टेलवर ती राहत होती. 20 डिसेंबरनंतर ख्रिसमसच्या सुटीसाठी ती मूळगावी गेली होती. तेथे 10-12 दिवस राहिल्यानंतर ती 4 जानेवारीला मुंबईत परत येण्यासाठी विशाखापट्टणम एक्स्प्रेसमध्ये बसली. 5 जानेवारीच्या पहाटे पाच वाजता ती कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसवर उतरली. त्यानंतर मात्र ती अचानक बेपत्ता झाली. ती फोनलाही प्रतिसाद देत नव्हती. मात्र ती कुर्ला स्थानकावर उतरल्याचे सहप्रवाशांनी सांगितले. मात्र ती सापडत नसल्याने कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली.
पुढे वाचा... ईस्टर अनुसयाच्या वागण्यात झाला होता बदल...