आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळशेज घाटात खासगी बस व स्विफ्टचा अपघात, दोघांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - माळशेज घाटातील छत्री पॉंईंटजवळ लग्नाची वरात घेऊन जाणा-या एका खासगी बस व स्विफ्ट गाडीमध्‍ये जोरदार अपघात झाला आहे. या अपघातात दोघे ठार झाले आहेत.
सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अहमदनगर येथून उल्हासनगरकडे लग्नासाठी निघालेल्या व-हाडी मंडळींच्या खासगी बसची स्विफ्टला धडक बसली. रविवारी रात्रीच्या सुमारास माळशेज घाटातील छत्री पॉईंटजवळ हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा घटनास्‍थळावरच मृत्‍यू झाला. सुमारे 20 जण या अपघातात जखमी झाल्‍याची माहिती मिळाली. जखमींना ओतूर
व आळेफाटा येथील खासगी हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे.
- श्रीरामपूरवरुन उल्हासनगरला परत येताना माळशेज घाटात हा अपघात झाला.
- घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तत्‍काळ मदतकार्याला सुरूवात केली.
- बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्‍याची माहिती आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..