आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकणमध्‍ये जीपची दुचाकीला धडक, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 3 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - चाकणमधील चिंबळीफाटा एका भरधाव महिंद्रा पिकअप जीपने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तीघांचा जागीच मृत्‍यू झाला आहे. तर 4 वर्षाचा चिमुरडा गंभीर जखमी झाला. अपघात मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झाला. हेमंत डुकरे हा चिमुरडा अपघातात जखमी झाला आहे. हेमंतवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्‍याची माहिती मिळाली आहे.

मृतांची नावे
- सुरेश डुकरे - वय 40
- वंदना डुकरे - वय 35
- तुषार डुकरे - वय 12
वंदना देहुगावच्‍या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका होत्या. सुरेश वेल्हेमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेवर चालक होते. रविवारी ते कुटुंबासह चाकणमध्ये नातेवाईकांकडे गेले होते. घरी परतताना भरधाव जीपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. चाकण पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.