आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीसाठी गावी जाणे महागले; एसटीच्या तिकीट दरात 20 टक्के वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधी बस व रातराणी बससाठी 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. - Divya Marathi
साधी बस व रातराणी बससाठी 10 टक्के वाढ करण्यात आली आहे.
मुंबईजळगाव- जळगाव- उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाने सलग तिसऱ्या वर्षी दिवाळीच्या काळात १० ते २० % हंगामी भाडेवाढीची घोषणा केली. शनिवारी हे आदेश जारी झाले. १४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान सर्व प्रकारच्या बस सेवांसाठी ही भाडेवाढ लागू राहील. साधी बस व रातराणी यामध्ये १०%, निमआराम बससाठी १५% व एसी बसेससाठी २०% भाडेवाढ असेल. 

दरम्यान, एक महिना आधीच बसचे आरक्षण होत असल्याने सध्या आरक्षण केंद्रावर  जादा भाडे आकारणीला सुरुवातही झाली आहे. हंगामानुसार भाड्यात ३०% पर्यंत वाढ किंवा कमी करण्याचा अधिकार महामंडळाला आहे. गेल्या वर्षी दिवाळीत जवळपास ३६ कोटी रुपये, तर त्याआधीच्या वर्षी ४२ कोटी रुपये महसूल महामंडळाला मिळाला होता.
 
कोणत्या बससाठी किती भाडेवाढ
साधी बस व रातराणी बससाठी 10 टक्के, निमआराम बस सेवांसाठी 15 टक्के आणि वातानुकूलित बससाठी 20 टक्के भाडेवाढ आहे. या भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाला चांगल्या प्रमाणात महसूल मिळतो. गेल्या वर्षी दिवाळीत अशाच प्रकारे भाडेवाढ केल्याने महामंडळाला 36 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्याआधीच्या वर्षी 42 कोटी रुपये महसूल एसटीला मिळाला होता.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...