आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील एसटी स्थानकांच्या जागेवर व्यापारी संकुल नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील एसटी स्थानके मोक्याच्या ठिकाणी असल्याने मागील सरकारने या एसटी स्थानकांवर व्यापारी संकुल उभे करण्याचा घाट घातला होता. मात्र, परिवहन विभागाने व्यापारी संकुले उभारण्यास मनाई घातली आहे. तसेच टायर्सची घाऊक खरेदी बंद करण्याकडेही आम्ही लक्ष देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिव्य मराठीला दिले.

रावते म्हणाले, एसटी बसेसचा वापर ग्रामीण भागातील गरीब वर्गातील नागरिक करत असल्याने त्यांच्या कष्टाच्या कमाईचा पुरेपूर मोबदला देण्याचा विचार परिवहन विभाग करत असून त्यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. एसटीची जमीन आम्ही कोणाच्याही घशात घालू देणार नाही. एसटी उभ्या करण्यासाठी जागा नाही, त्यामुळे ज्या ठिकाणी मोठी जागा आहे तेथे एसटी डेपो उभा करण्याचा विचार केला जात आहे. एसटी महामंडळाकडे तंत्रज्ञांची कमतरता आहे. त्यामुळे वेळेवर एसटी दुरुस्त होत नाही. चालक आणि वाहक यांच्या भरतीऐवजी आम्ही तंत्रज्ञांच्या भर्तीवर लक्ष देणार असून आगामी काळात तंत्रज्ञांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जाईल. तसेच एसटीतील शेवटची सीट खिळखिळी झालेली असते. रस्ते चांगले नसल्याने एसटीची अवस्था वाईट होते.

दर महिन्याला टायर खरेदी
शेवटच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला प्रचंड त्रास होत असल्याने या शेवटच्या सीटला शॉक अ‍ॅब्सॉर्बर्स लावण्याचा विचार केला जात असून त्यासाठी तज्ज्ञांकडून मते मागवणार आहोत. एसटीमध्ये घाऊक पद्धतीने टायर्स खरेदी केले जातात. त्यामुळे बराचसा पैसा हा त्यामध्ये गुंतून राहतो. यापुढे प्रत्येक टायरला एक इलेक्ट्रॉनिक चीप बसवण्याचा विचार असून त्यामुळे टायर किती चालला याची माहिती उपलब्ध होईल आणि जे टायर निकामी होतील तेवढेच प्रत्येक महिन्याला खरेदी केले जातील, असेही रावते यांनी सांगितले.