आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business In Asia Second Biggest Slum Area In Mumbai

आशियातील दुसरी मोठी झोपडपट्टी, मात्र, येथेच होतो अब्जावधीचा बिझनेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील धारावी झोपडपट्टीतील झोपड्यात असलेली रेडीमेड गारमेंटची फॅक्ट्री- फाईल फोटो. - Divya Marathi
मुंबईतील धारावी झोपडपट्टीतील झोपड्यात असलेली रेडीमेड गारमेंटची फॅक्ट्री- फाईल फोटो.
मुंबई- आज जागतिक लोकसंख्या दिवस आहे. या निमित्ताने आम्ही तुमच्याशी भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीबाबत माहिती देणार आहोत जी इंग्रजांनी गरीबांसाठी वसविली होती. स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत या धारावीचा वापर केवळ व्होट बॅंक म्हणून करण्यात आला. आजही येथील लोक डेव्हपलमेंटची आशा धरून बसले आहेत. मायानगरी मुंबईच्या मध्य भागात वसलेल्या या झोपडपट्टीत सुमारे 10 लाख लोक राहतात. पश्चिम माहिम आणि पूर्व सायन यादरम्यान 557 एकरात धारावीची झोपडपट्टी पसरली आहे.
अब्जावधी रूपयांचा व्यवसाय होतो धारावातून...
धारावीत राहणारे लोक आपल्या छोट्याशा घरातच व्यवसाय चालवतात. यात चामडी, टेक्सटाईल आणि घड्याळाची इंडस्ट्रीज अधिक आहे. आपल्याला हे वाचून आण ऐकून आश्चर्य वाटेल की येथे सिंगल रूममध्ये बनलेला मालही एक्सपोर्ट होतो. यात अनेक असे व्यवसाय ज्यांचा व्यवसाय करोडो, अब्जावधीचा आहे. मात्र, एवढी वर्षे एकाच जागेवरून बिझनेस केला तरी ते बाहेर आपले युनिट शिफ्ट करीत नाहीत.
मुंबईच्या बाहेरील लोक स्थिरावलेच धारावीत-
धारावीत मुख्यतः मुंबईच्या बाहेरून आलेले लोक राहतात. जे रोजगाराच्या शोधात आले ते धारावीत राहणे पसंत करतात. 1880 मध्ये इंग्रजांनी वसवलेल्या धारावीची स्थिती आज खूपच खराब आहे. लोकसंख्या वाढल्याने येथील झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे झोपड्यांची संख्या व त्याची उंची इतकी वाढली आहे की वरून पाहिले तर धारावीतील जमिन आकाशातून दिसतच नाही.
झोपड्याची किंमतही कोटींच्या घरात-
धारावीतील एका झोपड्याची किंमत 1 कोटीपर्यंत पोहचली आहे. आता येथील 1 sq feet जागेची किेंमत सुमारे 25,000 ते 30,000 इतकी आहे. दिसायला व म्हणायला ही झोपडपट्टी आहे मात्र, यात इतक्या खोल्या असतात व त्यात अनेक प्रकारचे व्यवसाय चालतात.
प्रत्येक पक्षाची व्होट बॅंक-
भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही धारावीत कोणताही बदल झाला नाही. मात्र, येथील झोपड्यांची संख्या वाढत राहिली. बोगस सर्टिफिकेट बनवून अमेक लोग येथे राहू लागले आहेत. यावर प्रत्येक राजकीय पक्ष आपला दावा ठोकतो. मात्र, मागील 15 वर्षापासून धारावी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचाच उमेदवार निवडून येत आहे. 2014 मध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड धारावीतून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, धारावीचे PHOTOS...