आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इन्कम टॅक्सचा स्लॅब वाढवा; व्यापाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चलन तुटवड्यामुळे हाेणारी गैरसाेय दूर करण्याची मागणी केली. तसेच व्यापाऱ्यांचा इन्कम टॅक्सचा स्लॅब वाढवण्याची मागणीही केली. दरम्यान, व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर अापण केंद्र सरकारशी चर्चा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली.

फेडरेशन रिटेल ट्रेडर्स असाेसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात मुंबईतील रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष आदर्श शेट्टी, आहार संघटनेचे अध्यक्ष निरंजन शेट्टी, चेंबूर मर्चंट असाेसिएशन यांच्यासह विविध २१ संघटनांचे पदाधिकारी सहभागी हाेते. रविवारी याच शिष्टमंडळाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडेही समस्यांचे गाऱ्हाणे मांडले हाेते. हजार व पाचशेच्या नाेटा बंद केल्यामुळे माेठ्या प्रमाणावर चलन तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे ग्राहकी घटली अाहे. चलन पुरवठा सुरळीत करतानाच जर केंद्र सरकारने कर सवलत जाहीर केली तर ग्राहकांमध्ये पुन्हा खरेदीचा उत्साह निर्माण हाेऊन व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे शहा यांनी सांगितले. क्रेडिट व डेबिट कार्डावर व्यवहार करताना लावण्यात येणारे शुल्क रद्द करण्यात यावे, अशी मागणीही या वेळी पदाधिकाऱ्यांनी केली. या संदर्भात सरकारशी बाेलून डिसेंबर, जानेवारीनंतर सकारात्मक ताेडगा काढू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शहा म्हणाले.

व्यापाऱ्यांच्या मागण्या
- बॅँकेमध्ये पैसे भरण्यासाठी आणि नोटा बदलण्यासाठी व्यापाऱ्यांसाठी वेगळे काउंटर.
- आहार असोसिएशनने परवाने नूतनीकरण करताना शुल्क स्वरूपात जुन्या नोटा स्वीकारा.
- छोट्या किमतीच्या जास्तीत जास्त नाेटा चलनात आणाव्यात, यासाठी पाठपुरावा करावा.
बातम्या आणखी आहेत...