आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवख्या मंत्र्यांमुळे माेदींच्या हाती सत्तेचे केंद्रीकरण, उद्योगपती राहुल बजाज यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे मंगळवारी इंडियन मर्चंट चेंबरच्या (आयएमसी) १०८ व्या सर्वसाधारण सभेत बीजभाषण झाले. स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध बजाज यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. केंद्र सरकारमधील काही ‘अननुभवी’ मंत्र्यांमुळे पंतप्रधानांच्या हाती सत्तेचे केंद्रीकरण होत आहे. देशात दुसरा राजकीय पर्यायच नाही, अशा भ्रमात राहणे स्वत:च स्वत:चा पराभव करून घेण्यासारखे आहे, असा इशाराही त्यांनी मोदी सरकारला दिला आहे. त्यांचे भाषण त्यांच्याच शब्दांत...

‘बहुतांश मंत्रीसंसदेत पहिल्यांदाच आले आहेत. त्यांच्याकडे ‘अननुभवाचीच पदवी’ आहे. त्यामुळे सत्तेचे केंद्रीकरण होतेय. दुर्बल मंत्र्यांची केंद्रीकरणाची प्रवृत्तीच असते. त्याचे काही फायदेही आहेत आणि एका अर्थाने ते चांगलेही आहे. मात्र भारतासारख्या विशाल देशात त्याला काही मर्यादाही आहेत. २०१४ लोकसभेत जनमताचा कौल एका माणसाला (नरेंद्र मोदी) मिळाला. तो कोणत्याही पक्षासाठी (भाजप) नाही. पंतप्रधानांमागे अजूनही जनमत आहे. हा एका माणसाचा विजय होता. मला एका माणसाचे सरकार म्हणायचे नाही. कारण मी असे म्हटल्याचे सुनील अलघ यांनी जाऊन मोदींना सांगितले तर मी अडचणीत येईन. आजही राजकीयदृष्ट्या लाट भाजपच्या बाजूने आहेे. मात्र सामान्य माणूस अजून फारसे काही केलेले नाही, असेच म्हणतो. अनुकूल वातावरण भाजपच्या बाजूने नव्हे तर पंतप्रधानांच्या बाजूने आहे, असे मला वाटते. देशात आता दुसरा राजकीय पर्यायच शिल्लक राहिलेला नाही, अशा भ्रमात राहणे स्वत:च स्वत:चा पराभव करून घेण्यासारखे आहे. निवडणुकीपूर्वी लोकांना (काळ्या पैशांबाबत) जी आश्वासने दिली ती चुकीची आहेत. ती पूर्ण केली जाऊच शकत नाहीत. तुम्हाला लक्षावधी डॉलर मिळणार नाहीत. तिकडे खडकूही नाही.’

मी असे बोललो, हे दिल्लीला सांगू नका!
पंतप्रधानमोदींनी टिप्पणी केल्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आपण ‘२७ टार्गेट’ची यादी तयार केल्याचे म्हटले आहे. त्यावर बजाज म्हणाले, सरकारवर जाहीरपणे टीका केल्यामुळे मलाही टार्गेट केले जाऊ शकते. (प्रेक्षकांत बसलेल्या भाजपच्या विश्वासू व्यक्तीकडे पाहून)कृपया मी असे बोललो हे दिल्लीला कळवू नका. नाहीतर दिल्लीत मला त्रास होईल.

दुसरा राजकीय पर्याय नाही, अशा भ्रमात राहू नका
ज्या क्षणी विरोधी पक्षातून कोणी सत्तेत येतो, तो बदलतो. आता आपल्याला पर्यायच राहिलेला नाही, असे जेव्हा त्यांना वाटू लागते, त्याची परिणती बहुतेक वेळा स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेण्यातच होते.
बातम्या आणखी आहेत...