आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bye Election To Maharashtra Legislative Council Dhananjay Munde Meet Raj Thackeray

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धनंजय मुंडेंच्या ठाकरे भेटीने 'राज'कीय वर्तूळात चर्चेला उधाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आज (बुधवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे असलेल्या धनंजय यांनी दीड वर्षापासून काकांची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जाते. भाजपने आपला अधिकृत उमेदवार मागे घेतला असून अपक्ष पृथ्वीराज काकडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच गोपीनाथ मुंडे स्वतः काकडे यांना विजयी करण्यासाठी झटत आहेत. शिवसेना, भाजपसह सर्वच विरोधीपक्षांच्या सदस्यांची मते त्यांच्या पारड्यात पडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे धनंजय मुंडे विजयी होतील असा विश्वास आघाडीतील नेत्यांना आहे. मात्र, मनसेची मतेही धनंजय यांना मिळाली तर त्यांच्या विजयाचा मार्ग आणखी सोपा होणार आहे. त्यासाठीच आजची ही भेट असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, मनसे या निवडणूकीत तटस्थ राहाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.