आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क वर्ग पालिकांच्या कामांसाठी रोहयोतून शंभर कोटी : राऊत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील क वर्ग नगरपालिकांच्या हद्दीतील विविध विकासकामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यासाठी 100 कोटी देण्यात येणार असल्याची माहिती रोहयो आणि जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. तसेच पाणंद रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी 200 कोटी आणि रोहयोच्या अपूर्ण कामांसाठी 100 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

राज्यातील 146 नगरपालिका क वर्गामध्ये असून कमी महसूलामुळे तेथे विकासकामे करता येत नसल्याने लोकांना नागरी सुविधा देणे या नगरपालिकांना शक्य होत नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे गल्लीबोळांमुळे चांगले रस्ते तयार करणे प्रशासनासमोर अडचणीचे झाले असून या प्रश्नातुन नगरपालिकांची सोडवणूक तसेच नागरीकांना चांगल्या सुविधा देण्याच्या हेतुने रोहयो खात्याने 100 कोटींची विविध विकास कामे करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या रोहयोंतर्गत या नगरपालिकांच्या हद्दीत शौचालये, नाला, विहीरी, पिण्याचे पाणी, क्रिडांगणे, स्मशानभूमी, दहनघाट बांधण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने नगरपालिकांना आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राऊत यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून या कामाला सुरूवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नगरपालिकानंतर महानगरपालिकांच्या क्षेत्रातही ही कामे करण्याचा राज्य सरकार विचार असल्याचे त्यांनी सांगितले.