आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य मंत्रिमंडळाचा येत्या 7 दिवसात विस्तार; शिवसेनेच्या भूमिकेविषयी उत्सुकता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राज्य मंत्रिमंडळात बदल करण्याची शक्यता आहे. येत्या 7 दिवसात राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळातील बदलाची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळात किती नवे चेहरे समाविष्ट केले जातील, याबाबत मात्र शंका आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कमी आणि मंत्रिमंडळात फेरबदल जास्त असेल, असे सांगण्यात येत आहे. 
 
मेहता, देसाईंचे काय?
गेल्या काही दिवसांमध्ये गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या एसआरए घोटाळ्यामुळे आणि एमआयडीसीतील घोटाळ्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई वादात आहेत. दोन्ही मंत्र्यांच्या चौकशीसाठी समितीही नियुक्त केली आहे. मात्र स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा हवाला या चेहऱ्यांसकट कसा देणार ? हा प्रश्न आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील चेहऱ्यांमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत.
 
शिवसेनेची भूमिका?
 राज्य मंत्रिमंडळात शिवसेनेला संधी मिळते का आणि किती प्रमाणात संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...