आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार, वाचा कुणाची नावे मंत्रिपदासाठी आहेत चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रापाठाेपाठ महाराष्ट्रातही मंत्रिमंडळ विस्ताराला वेग अाला असून त्यासाठी उद्याचा (शुक्रवार) ‘मुहूर्त’ काढण्यात अाला अाहे. भाजपकडून भाऊसाहेब फुंडकर, जयकुमार रावल, संजय सावकारे, देवयानी फरांदे व स्मिता वाघ यांच नावे जवळपास निश्चित झाली आहेत. तसेच यवतमाळचे मदन येरावार आणि बुलढाण्याचे संजय कुटे यांचीही नावे चर्चेत आहेत.
गृह राज्यमंत्री राम शिंदे यांना कॅबिनेटपदी बढती मिळण्याची चिन्हे अाहेत. भाजपचे मित्रपक्ष असलेले महादेव जानकर (रासप) व सदाभाऊ खाेत (स्वाभिमानी) यांचेही ‘लाल दिव्या’चे स्वप्न साकार हाेणार अाहे. विशेष म्हणजे एक कॅबिनेट व एक राज्य मंत्रिपद मिळण्याचा शिवसेनेचा हट्ट पूर्ण हाेण्याच्या मार्गावर अाहे.
ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर हे सुरुवातीपासूनच मंत्रिपदाचे दावेदार हाेते. मात्र बुलडाण्यातून संजय कुटे की फुंडकर असा ितढा होता. मात्र ज्येष्ठता आणि बहुजन नेतृत्व, अनुभव या निकषांवर फुंडकरांची यंदा मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता अाहे. खान्देशामधून जयकुमार रावल यांचीही वर्णी लागणार असल्याचे सांगितले जाते. संजय सावकारे यांच्या रुपाने दलित चेहऱ्याला मंत्रिमंडळात संधी देण्याचे प्रयत्न पक्षाकडून केले जात अाहेत.
दाेन महिलांना संधी : मंत्रिमंडळात महिलांन स्थान देण्याच्या उद्देशाने नाशिकच्या देवयानी फरांदे, जळगावमधून स्मिता वाघ यांचाही मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जाताे. फरांदे पहिल्यांदाच अामदार झाल्या असल्या तरी त्यांची लोकप्रतिनिधी म्हणून चांगली कामगिरी झाली असल्याचा िवश्वास पक्षाला वाटतो. तर माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अाग्रहाखातर वाघ यांना संधी देण्यात येणार असल्याचे बाेलले जाते.
फुंडकरांना कृषी, वाघ महसूल राज्यमंत्रिपदाची शक्यता
फुंडकर यांना कृषी विभागाचे कॅबिनेट मंत्रीपद तर िस्मता वाघ यांना महसूल राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय झाल्याचीही माहिती अाहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने लढणारे सदाभाऊ खाेत यांच्याकडे कृषी राज्यमंत्रिपद देण्याची शक्यता अाहे. कॅबिनेट मंत्रिपदच मिळाले पाहिजे असा जानकरांचा हट्ट असला तरी अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... शिवसेनेत अनेक इच्छुक... राम शिंदेंना बढती, महसूल अनिश्चित
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...