आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रीमंडळ विस्तार : राज्यातून लागणार कोणाची वर्दी, शिवसेनेला मिळणार आणखी एक मंत्रीपद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रीय मंत्रिमंडळाचा या रविवारी सकाळी 10 वाजता विस्तार होणार असून नव्या मंत्र्यांचा शपथविधी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्यातील कोणाकोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे. सुरेश प्रभु यांच्या जागी नितीन गडकरी हे नवे रेल्वेमंत्री होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रभु किंवा विनय सहस्त्रबुध्दे यांना पर्यावरण मंत्रालय दिले जाऊ शकते, असेही समजते. अनिल दवे यांच्या मृत्यूमुळे पर्यावरण मंत्रालयाचा भार हर्षवर्धन यांच्याकडे आहे. राम माधव यांच्याही नावाची चर्चा आहे. शिवसेनेकडून कोणाचा शपथविधी होतो का याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठा समाजाचे नेते म्हणुन खासदार संभाजी राजे यांचेही नाव चर्चेत आहे. 
 
राजीव प्रताप रुडी, उमा भारती, कलराज मिश्र, संजीव बाल्यान, महेंद्रनाथ पांडेय आणि निर्मला सीतारमण यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
शिवसेनेकडून कोण?
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी खासदार अनिल देसाई आणि खासदार आनंदराव अडसूळ यांची नावे चर्चेत आहेत. सध्या शिवसेनेचे अनंत गीते हे मोदींच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्रालय सांभाळत आहेत. दरम्यान शिवसेना 3 मंत्रिपदांसाठी अाग्रही असून तीव्र नाराज असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. 
 
गडकरी यांची राजकीय वाटचाल
1995 मध्ये युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गडकरी यांच्या कारकिर्दीत महत्त्वाकांंक्षी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बांधण्यात आला होता. भाजपचे अध्यक्ष म्हणून 2009 ते 2013 या काळात काम पाहिल्यानंतर त्यांनी 2014 पासून आतापर्यंत केंद्रीय मंत्रीमंडळात परिवहन मंत्री म्हणून काम केले आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती....
बातम्या आणखी आहेत...