आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Discusses Cabinet Expansion With Smaller Allies

मंत्री करू, पण राज्यात परतावे, रामदास आठवले यांची कोंडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘रिपाइं’ला मंत्रिपद देऊ मात्र, त्यासाठी तुम्ही दिल्लीहून परतायला पाहिजे, अशी चमत्कारिक अट भाजपने रामदास आठवले यांच्यासमोर ठेवल्याने सोमवारी झालेल्या घटक पक्षांच्या संवाद बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ कायमच राहिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि ‘रासप’चे महादेव जानकर यांना मात्र मंत्रिपद मिळण्याची शंभर टक्के खात्री वाटते आहे.

फडणवीस सरकारची वर्षपूर्ती झाली तरी भाजपने घटक पक्षांना मंत्रिमंडळाबाहेरच ताटकळत ठेवले होते. बिहारमधील निकाल आणि फडणवीस सरकारविरोधातील असंतोष पाहून मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे सध्या हलले आहे. घटक पक्षांच्या मागण्यांचा कानोसा घेण्यासाठी सोमवारी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी संवाद बैठक ठेवली होती.
भाजप नेत्यांनी रामदास आठवले यांच्याशी या बैठकीत स्वतंत्र चर्चा केली. तुम्हाला केंद्रात राज्यसभा दिली आहे. राज्य विधिमंडळात ‘रिपाइं’चा एकही सदस्य नाही. मंत्रिपद द्यायचे तरी कसे? त्यामुळे तुम्ही राज्यात परतावे, रिपाइंला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येईल. रिपाइंच्या इतर कुणास मंत्रिपद देता येणार नाही, असे आठवले यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितल्याचे कळते.

आज ना उद्या धनगर आरक्षणाचा प्रश्न राज्यात उभा राहू शकतो. रासपचे जानकर सध्या परिषदेचे सदस्यही आहेत. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला तोंड देण्यासाठी धनगर समाजाचा उपयोग आहे. त्यामुळे रासपच्या महादेव जानकर यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्यात रासप नक्की असेल, असे जानकर यांनी दिव्य मराठीला सांगितले.
राज्यात परतायचे नाही
केंद्रात आणि राज्यात रिपाइंला दाेन मंत्रिपद पाहिजेत. मला राज्यात यायचे नाही. मात्र, निर्णयास मी दोन दिवसांचा अवधी मागितला आहे. राज्यात मिळालेले मंत्रिपद घरात ठेवणार नाही इतके नक्की, असा खुलासा रामदास आठवले यांनी केला आहे. संवाद बैठकीत घटक पक्षांची मते जाणून घेतली. त्यानंतर रात्री भाजपच्या कोअर समितीची बैठक होणार होती. त्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आणि मंत्रिपदावर शिक्कामाेर्तब होणार आहे.