आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळात निलंगेकर, खाेत, जानकरांना संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हाेणारा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काही कारणामुळे बारगळला. मात्र अाता त्याला अाॅगस्ट महिन्याच्या पहिल्या अाठवड्याचा मुहूर्त लागला असल्याची खात्रीलायक माहिती अाहे. या विस्तारात दहा नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार असून ५ कॅबिनेट व ५ राज्यमंत्र्यांचा समावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या विस्तारात भाजपच्या वाट्याला सहा, शिवसेनेला दाेन तर राष्ट्रीय समाज पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळणार अाहे. भाजपच्या सहापैकी चौघांना कॅबिनेट तर दोघांना राज्यमंत्रिपद मिळणार असून शिवसेनेच्या वाट्याला दाेन्ही राज्यमंत्रिपदच येणार असल्याचे समजते. नुकतेच मुंबई दाैऱ्यावर येऊन गेलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी या विस्ताराचा नवा मुहूर्त काढला असल्याचे सांगितले जाते.

सध्याच्या ३० सदस्यीय मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांकडे सर्वाधिक ७ खाती असून त्यापाठेापाठ एकनाथ खडसे व विनोद तावडे यांच्याकडे प्रत्येकी पाच विभाग आहेत. एका मंत्र्यांसाठी एवढी खाती सांभाळणे तारेवरची कसरत असल्याने विस्तारात ही खाती नव्या चेहऱ्यांकडे देण्यात येतील.

दहापैकी सहा जागा भाजपच्या पारड्यात, दाेन शिवसेनेला
संभाव्य मंत्री
भाजप : अाशिष शेलार, डॉ. संजय कुटे, मंगलप्रभात लोढा, संभाजी पाटील निलंगेकर (कॅबिनेट मंत्री). मदन येरावार, देवयानी फरांदे (राज्यमंत्री)
शिवसेना : गुलाबराव पाटील, सदा सरवणकर (राज्यमंत्री).
राष्ट्रीय समाज पक्ष : महादेव जानकर (कॅबिनेट)
स्वाभिमानी शेतकरी संघटना : सदाभाऊ खोत (राज्यमंत्री)

रिपाइंला मात्र ठेंगाच
सर्व मित्रपक्षांना भाजप सरकारमध्ये सामावून घेण्याच्या तयारीत असले तरी रामदास अाठवलेंच्या रिपाइंला मात्र यंदाही लाल दिवा मिळणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त अाहे. रिपाइंचा सध्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सध्या एकही आमदार नाही. तसेच विधान परिषदेच्या िनवडणुका आणखी ७ महिने होणार नसल्याने िरपाइंला सध्या शांत बसण्यावाचून पर्याय नसेल.

विस्ताराबरोबर खांदेपालटही
विस्ताराबरोबर खांदेपालटही होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचे गृहखाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाणार आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीच तशा सूचना दिल्याची माहिती अाहे. याशिवाय एकनाथ खडसे यांच्याकडे असलेले कृषिमंत्रिपद महादेव जानकरांकडे सोपवण्यात येईल. पंकजा मुंडे यांनी जानकरांच्या नावाचा आग्रह धरला असून मुख्यमंत्रीही त्याला अनुकूल असल्याचे सांिगतले जाते.
बातम्या आणखी आहेत...