आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Call Girl Arrested In Connection With Looting MP\'s Son In Mumbai

खासदाराच्या मुलाला लुटणारी कॉलगर्ल अटकेत, आहे माजी नौदल अधिकाऱ्याची मुलगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- खासदार महोदय आणि त्यांच्या मुलाचा फोटो.)
मुंबई- उत्तर प्रदेशातील अमरोहाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार कंवरसिंह तन्वर यांचा मुलगा मेहरसिंह याला लुटणारी कॉलगर्ल ज्युली आणि एजंट अशोक अभिषेक प्रसाद यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तिला 24 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कॉलगर्लने लुटल्यानंतर मेंहरसिंहने आणखी एक कॉलगर्ल बोलविली होती. याची माहिती सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाली आहे. दरम्यान, ज्युली नावाची कॉलगर्ल निवृत्त नौदल अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये रविवारी रात्री मेहरसिंह काही कामानिमित्त थांबला होता. त्यावेळी मौजमस्ती करण्यासाठी त्याने एजंटच्या माध्यमातून एका कॉलगर्लला बोलविले. पण या कॉलगर्लने चाकू दाखवून मेहरसिंहला दीड लाख रुपयांनी लुटले. त्यानंतर ती तेथून पसार झाली. त्यानंतर मेहरसिंहने एस्कॉर्ट एजंसिला फोन करुन दुसऱ्या कॉलगर्लला बोलविले. पहाटे तीनच्या सुमारास दुसरी कॉलगर्ल त्याच्या खोलीतून बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे.
मुंबईच्या वाकोला पोलिस ठाण्यात ज्युली आणि तिच्या ड्रायव्हरविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली होती.
ज्युली नावाच्या कॉलगर्लचे शिक्षण मुंबईच्या प्रसिद्ध कॉलेजमधून झाले आहे. तिचे वडील निवृत्त नौदल अधिकारी आहेत. ती गेल्या चार वर्षांपासून एस्कॉर्ट एजंसीसोबत काम करीत होती. नाव बदलून ती काम करते. ज्युली हेही तिचे खरे नाव नसल्याचा संशय पोलिसांना आहे.
खासदार महोदयांचे स्पष्टीकरण
चिरंजीवासोबत लूटमारीची घटना झाल्यानंतर त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न खासदार महोदयांकडून होत आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले, की माझा मुलगा मेहरसोबत त्याचा लंडनचा एक मित्र होता. त्याचे पूर्णनाव खासदार महोदयांना माहिती नाही, पण आडनाव गिल आहे. त्याच्यासोबत लूटीची घटना झाल्याचे ते म्हणाले.
मेहरने सांगितले कशी झाली लूट
मेहरसिंह यांच्या म्हणण्यानूसार, एस्कॉर्ट सर्व्हिसला फोन केल्यानंतर जेव्हा कॉलगर्ल आली तर तिने हॉटेलच्या बाहेरुनच फोन केला. मेहर हॉटेल बाहेर तिच्या कार जवळ गेला तेव्हा तिने त्याच्या पोटाला चाकू लावत पैशांची मागणी केली. घाबरलेल्या मेहरने खिशात असलेले दीड लाख रुपये काढून तरुणीच्या हातात ठेवले. पैसे घेऊन ती फरार झाल्यानंतर मेहर वाकोला पोलिस स्टेशनमध्ये गेले आणि लूटमार झाल्याची तक्रार दिली. त्यांनी तरुणीचे वर्णन केले त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली आणि दोन संशयीतांना ताब्यात घेतले. लूटमारीची घटना हॉटेलच्या लॉबीमध्ये नाही तर कारमध्ये घडल्याचे पोलिसांनी सांगितले.