आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘छम्मकछल्लो’ संबोधणे महिलांचा अपमान: काेर्ट; आरोपीला दिवसभर शिक्षेसह एक रुपया दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. - Divya Marathi
ठाणे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
ठाणे- ‘छम्मकछल्लो’ हा शब्द बॉलीवूडमध्ये सर्रासपणे वापरला जात असला तरी खऱ्या आयुष्यात हा शब्द कुणालाही उद्देशून संबोधणे महागात पडू शकते. कारण ठाणे न्यायालयाने एका महिलेच्या तक्रारीनंतर ‘छम्मकछल्लो’ म्हणणाऱ्या आरोपीला एका दिवसाचा तुरुंगवास आणि एक रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे हे प्रकरण तब्बल आठ वर्षांनंतर निकाली निघाले.  
 
काय आहे प्रकरण...?
जानेवारी २००९ मध्ये फिर्यादी महिला ही पतीसोबत मॉर्निंग वॉक करून घरी जात असताना तिच्या धक्क्याने आरोपीचा कचऱ्याचा डब्बा रस्त्यावर पडला. त्यामुळे त्याने याबाबत महिलेला जाब विचारला असता त्यांच्यात बाचाबाची झाली. आरोपीने महिलेला ‘छम्मकछल्लो’ संबोधले.  पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे तिने न्यायालयात याचिका दाखल करून न्याय देण्याची मागणी केली. या याचिकेवर ठाणे न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. न्यायालय म्हणाले, ‘छम्मकछल्लाे’ हा शब्द बॉलीवूडमध्ये सर्रासपणे वापरला जात असला तरी सामान्य भाषेत याचे वेगवेगळे अर्थ  काढले जाऊ  शकतात. या शब्दामुळे महिलांना अपमान वाटू शकतो. त्यामुळे महिलेची तक्रार योग्यच आहे, असे सांगून न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची साधी कैद आणि केवळ एक रुपया दंड ठोठावला.
 
कोर्टाने काय म्हटलंय
न्यायदंडाधिकारी आर. टी. इंगळे यांनी आपल्या निकालात म्हटले आहे की, 'हा एक हिंदी शब्द आहे. इंग्लिशमध्ये असा शब्द नाही. भारतीय समाजात अशा शब्दांचा अर्थ त्याच्या वापरानुसार समजला जातो. सामान्यत: त्याचा उपयोग महिलेचा अपमान करण्यासाठी केला जातो. महिलेचे कौतुक करण्यासाठी हा शब्द नाही. यामुळे महिलांना चीड येते, राग येतो.'
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...