आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Campa Cola Compound Building Unathorised Flat Issue

कॅम्पा कोलावरील कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, सहा महिन्यांसाठी दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वरळीतील कॅम्पा कोला इमारतीवर मुंबई पालिकेने कारवाईला सुरुवात केल्यानंतर तेथील रहिवाशांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याचे लक्षात येताच व याबाबत प्रसारमाध्यमांत बातम्या झळकताच त्याची दखल सुप्रीम कोर्टाने स्वत:हून तत्काळ घेतली. त्यामुळे कॅम्पा कोला इमारतीवर 31 मे 2014 पर्यंत कारवाई करण्याला स्थगिती दिली.
माध्यमांनी गेल्या दोन दिवसापासून कॅम्पा कोलाच्या बातम्या दाखविल्या होत्या. त्याची दखल घेत रहिवाशांची राहण्याची पर्यायी व्यवस्था केले नसल्याची बाब पुढे आली. त्याची दखल घेत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार, बिल्डर, मुंबई पालिकेला त्यांची पर्यायी व्यवस्था काय केली असा सवाल विचारला. दरम्यान, याचे उत्तर देण्यासाठी या तीन यत्रंणाना आज दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ दिली होती. मात्र कोर्टाने ही वेळ वाढवून ती गुरुवारपर्यंत केली व लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले. सरकारने उत्तर दिल्यानंतर आता याबाबत पुढील सुनावणी घेतली जाईल.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे कॅम्पा कोला सोसायटीच्या रहिवाशांनी स्वागत केले आहे. तसेच आम्हाला तात्पुरता दिलासा नको असून कायमचे सोल्यूशन हवे आहे. आम्ही चोर नसून आमचा यात गुन्हा काय ते सांगावे, असे माध्यमांसमोर रहिवाशांनी प्रतिक्रिया दिल्या. यावेळी रहिवाशांनी माध्यमांचे, कोर्टाचे व राजकीय पक्ष व नेत्यांचे आभार मानले. सोसायटीतील रहिवाशांबरोबरच केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, आम आदमीच्या अंजली दमानिया, भाजपच्या शायना एन सी यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
आणखी पुढे वाचा....