आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Campa Cola News In Marathi, Mumbai Municipal Corporation, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कॅम्पाकोला’वासीयांचा दैवावर हवाला, प्रचंड विरोधामुळे पालिकेचे पथक हात हलवत परत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वरळी परिसरातील कॅम्पाकोला सोसायटीत बेकायदा उभारण्यात आलेले इमले सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी तोडण्यासाठी महापालिकेचे पथक शुक्रवारी सकाळी धडकले. मात्र रहिवाशांनी केलेल्य तीव्र विरोधामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या पथकाला हात हलवत परतावे लागले. रहिवाशांनी चर्चेचीही विनंती धुडकावल्यामुळे महापालिका आता सर्वाेच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याच्या विचारात आहे. दरम्यान, शनिवारी पोलिस बळाचा वापर करून इमारतींवर कारवाई करणार असल्याचे पालिका अधिका-यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांना घरे सोडण्यासाठी दुस-यांदा दिलेली मुदत संपल्यानंतर शुक्रवारी सकाळी पालिकेचे पथक कारवाईच्या उद्देशाने इमारतीजवळ धडकले. मात्र तेथील रहिवाशांनी सर्व गेटस् बंद करून एकाही अधिका-याला सोसायटीत प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे गेटच्या एका बाजूला रहिवाशांचा जमाव तर दुस-या बाजूला अतिक्रमणविरोधी पथक व पोलिस असे चित्र निर्माण झाले होते.

रिपाइं, मनसेची निदर्शने
पालिका अधिका-यांनी रहिवाशांना चर्चेची विनंती केली, मात्र ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते. त्यातच रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. काही वेळातच मनसेचे कार्यकर्तेही धडकले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दिवसभर हा गोंधळ सुरू होता. अखेर सायंकाळी पालिका अधिका-यांनी सातही इमारतीच्या अध्यक्षांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. अखेर आजपुरती ही कारवाई स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रवेशद्वारावरच होमहवन
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा कारवाई करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी आले होते त्यावेळी येथील रहिवाशांनी कायदेशीर लढा देत कारवाईला काही दिवस का होईना स्थगिती मिळवली होती. आता सर्वोच्च न्यायालयानेच कारवाईचे आदेश दिल्याने रहिवाशांनी देवाची करुणा भाकायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच कँपाकोला इमारतींच्या दोन्ही प्रवेशव्दारांवर होमहवन आणि मंत्रपठण सुरू करण्यात आले होते.