आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Campacola Building News In Marathi, Divya Marathi, Mumbai Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅम्पाकोला रहिवाशांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल, फुटेज तपासून होणार कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महापालिकेच्या पथकाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यापासून रोखणा-या कॅम्पाकोला कंपाउंडमधील रहिवाशांविरोधात महापालिकेने वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी कॅम्पाकोला कंपाउंडमधील अनधिकृत घरांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला रहिवाशांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावरच रोखले होते. महापालिकेने या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले असून, तक्रार दाखल करताना पालिकेने हे चित्रीकरणही पोलिसांना दिले आहे. वरळी पोलिसांनी रहिवाशांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओ फुटेज तपासून दोषींविरोधात कारवाई करण्यात येईल.
शुक्रवारी कॅम्पाकोलाच्या रहिवाशांनी गॅस आणि वीज तोडणीसाठी आलेल्या पालिकेच्या पथकाला प्रवेशद्वारावरच रोखल्याने पालिका अधिका-यांना परत जावे लागले होते. बळाचा वापर करण्यापूर्वी पालिका अधिकारी पुन्हा एकदा घरे रिकामी करण्यासाठी रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, शनिवारी कॅम्पाकोलाच्या आसपासचा बंदोबस्त पोलिसांनी कमी केला आहे.