आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅम्पाकोलाला दिलेली मुदत संपली; रहिवाशांच्या प्रशासनाला 14 जाचक अटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील कॅम्पाकोला सोसायटीतील रहिवाशांना देण्यात आलेली मुदत आज संध्याकाळी 5 वाजता संपली आहे. मुदत संपल्याने रहिवाशी पालिकेकडे आपल्या घराच्या चाव्या सुपूर्त करतील असे सांगितले जात आहे. त्यामुळे हा अनधिकृत भाग पाडला जाणार हे आता जवळ जवळ निश्चित झाले आहे.
दरम्यान, रहिवाशांनी पालिकेकडे चाव्या सुपूर्त करण्याची तयारी दाखवली आहे मात्र त्यासाठी आमच्या 14 अटी मान्य कराव्यात अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे सरकार व पालिका प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. काहीही झाले तरी आम्ही आमची घरे रिकामी करणार नाहीत असा ताठर भूमिका कॅम्पाकोलाच्या रहिवाशांनी आधी घेतली होती. कायदेशीर मार्गाने लढलेल्या लढाईत अपयश आल्यानंतर कॅम्पाकोलावासियांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र काही अटींवर घरे रिकामी करण्याची तयारी दर्शिवली आहे. मात्र अशा कोणत्याही अटी सरकार किंवा मुंबई पालिका मान्य करण्याची शक्यता नाही.
कॅम्पाकोला सोसायटीतील अनधिकृत फ्लॅट पाडण्यापूर्वी रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडे घरे रिकामी करून चाव्या सुपूर्त कराव्यात असे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. त्यावर रहिवाशांनी फ्लॅट रिकामे केले आहेत. मात्र, पार्किंगमध्येच ठाण मांडले आहे. तसेच पालिका प्रशासनाकडे चाव्या सुपूर्त करण्याची तयारी दर्शिवली आहे. मात्र, त्यासाठी 14 अटी घातल्या आहेत. यातील प्रमुख अटी अशा आहेत की, आम्ही पालिकेला दिलेला दंड परत करावा. यापुढे अनिधकृत इमारतींना दंड न घेता त्या सर्व पाडल्या पाहिजेत. आम्हाला जो न्याय दिला जाणार आहे तोच न्याय इतरांना द्यावा लागेल त्याचे लिखीत स्वरूपात माहिती द्यावी अशी भूमिका आता रहिवाशांनी घेतली आहे.
दरम्यान, फ्लॅट तोडण्यासाठी पालिकेने काढलेल्या निविदेला कोणत्याही ठेकेदाराने अद्याप प्रसंती दर्शिवली नाहीये. दोन वेळा निविदा काढून प्रतिसाद न आल्याने पालिका प्रशासनापुढे नवा प्रश्न उभा राहिला आहे. रहिवाशांचा रोष पत्करण्याची कोणत्याही ठेकेदाराची इच्छा नाहीये.
दुसरीकडे, कॅम्पा कोला सोसायटीतील महिलांनी प्राण गेला तरी चालेल पण, आम्ही आमच्या हक्काचे, आयुष्यभर मर-मर करून व लाखो रूपये देऊन घेतलेले घर सोडणार नाही अशी ताठर भूमिका घेतली आहे. बिल्डर आणि अधिकार्‍यांच्या चुकीची शिक्षा आम्हाला का, असा सवाल उपस्थित करून राज्य सरकार विरोधातही ते आपला रोष व्यक्त करत आहेत.
मुंबईतील कॅम्पाकोला सोसायटीतील रहिवाशांनी अशा प्रकारे केली निदर्शने....बघा पुढील स्लाईडवर...