आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Can A Woman Be Booked For Molesting Another Woman, Asks Bombay High Court

महिलाच महिलेचा विनयभंग करू शकते? मुंबई हायकोर्टाकडून विचारणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भादंविच्या कलम 354 अंतर्गत महिलेवर दुसर्‍या महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. एका 78 वर्षीय महिलेवर 55 वर्षीय महिलेने विनयभंगाचा खटला दाखल केला होता. हा खटला फेटाळण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणीप्रसंगी न्यायालयाने ही विचारणा केली. यासंबंधी अभ्यास करण्याचे निर्देश न्यायालयाने याचिकार्त्यांचे वकील प्रदीप हावनूर यांना दिले आहेत.

विमलाबाई शहा यांच्याविरोधात त्यांच्याच इमारतीत राहणार्‍या दुसर्‍या महिलेने ही याचिका दाखल केली होती. विमलाबाई यांचा मुलगा इमारतीचा सचिव होता. त्याने संबंधित महिलेला फ्लॅटच्या एका गैरव्यवहाराबाबत नोटीस पाठवली. त्याचा वचपा काढण्यासाठी ही तक्रार देण्यात आली होती, असे शहा कुटुंबीयांचे म्हणणे आहे.