आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

122 वर्षानंतर एखादा भारतीय उडवेल स्वत:चेच विमान, 19 वर्षाचे कष्ट फळाला!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1895 मध्ये मुंबईतील शिवकर तळपदे यांनी चौपाटीवर स्वत: बनविलेले विमान उडविले होते. - Divya Marathi
1895 मध्ये मुंबईतील शिवकर तळपदे यांनी चौपाटीवर स्वत: बनविलेले विमान उडविले होते.

मुंबई- 1895 मध्ये मुंबईतील शिवकर तळपदे यांनी चौपाटीवर स्वत: बनविलेले विमान उडविले होते. यानंतर 122 वर्षांनी आता आणखी एक मुंबईकरच कॅप्टन अमोल यादव स्वत: बनविलेले एयरक्राफ्ट उडवू शकतील. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादव यांना डीजीसीएचे सर्टिफिकेट दिले. जेट एयरवेजमध्ये डेप्टी चीफ पायलट राहिलेले अमोल यांनी घरावरील छतावरच 19 वर्षाच्या मेहनतीनंतर एयरक्राफ्ट टीएसी-003 बनविले. एयरक्राफ्ट 2011 मध्ये बनविले होते. तेव्हापासून अमोल सर्टिफिकेट मिळविण्याच्या प्रयत्नात होते.

 

13 हजार फूट ऊंचीवर उडवू शकतील टीएसी-003-

 

- अमोल यादव यांनी सांगितले की, ''मी सर्वप्रथम 1998 मध्ये, नंतर 2003 मध्ये टू-सीटर एयरक्राफ्ट बनविले. दोन्हीची चाचणी अपयशी ठरली. मात्र, त्या अपयशातूनच मी काही शिकलो. नंतर थ्रस्ट एयरक्राफ्ट नावाने कंपनी बनविली आणि तिस-यांदा प्रयत्न सुरु केला.''
- ''आठ सिलेंडर वाल्या ऑटोमोबाईल इंजिनचा वापर केला. 2011 मध्ये माझ्या प्रयत्नांना यश आले. एयरक्राफ्ट टीएसी-003 तयार करताना मला खूप संघर्ष करावा लागला. ''

 

आईचे मंगळसूत्र विकले, भावाने घर गहाण ठेवले-

 

- ''माझ्या आईने आपले मंगळसूत्र विकून मला पैसे दिले. भावाने आपले घर सुद्धा गहाण ठेवले. मी एयरक्राफ्ट तयार करण्यासाठी घरातील छतावरच टीन शेड लावले आणि काम सुरु केले. 
- ''टीएसी-003 चे वजन 1450 किलो आहे. ते 1500 फूट प्रति मिनिट या वेगाने टेक ऑफ करून, 13 हजार फूट ऊंचीपर्यंत उड्डाण करू शकते. हवेचा वेग 185 नॉटिकल मीलपर्यंत असेल. मी जेव्हा हे विमान एखाद्या प्रदर्शनात घेऊन जायचो तेव्हा मला ते क्रेनने उतरावे लागायचे.''

 

फडणवीसच्या मदतीने मिळाले सर्टिफिकेट-

 

- ''एयरक्राफ्ट तयार केल्यानंतर 2011 मध्ये डीजीसीएकडे नोंदणी करून प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) मागितले. मात्र, तेथील अधिका-यांनी आम्ही धोका पत्करू शकत नाही असे सांगत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबईत मेक इन इंडिया वीक होता त्यावेळी मी हे विमान घेऊन पोहचलो होतो. त्याला प्रदर्शनात ठेवण्याचा विचार ठेवला. माझ्याजवळ परवानगी नव्हती, पोलिस मला तेथून हाकलून देऊ लागले.''
- ''ही माहिती मिळताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला भेटायला बोलावले. माझी अडचण समजून घेतल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर हा विषय घातला. सीएम आणि पीएम यांनी माझ्यासाठी 4 बैठका घेतल्या. मला आता याचा आनंद झाला आहे, माझे यश फळाला आले. 
- देश स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रथमच एखाद्या कंपनीला, व्यक्तीला खासगी विमान बनविण्याची परवानगी मला दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान मोदींनी लक्ष घातल्यामुळेच हे शक्य झाले.''

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज....

बातम्या आणखी आहेत...