आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Car Accident In Mumbai & Goa Highway, 5 Died, 28 Injured

मुंबईत कार अपघातात औरंगाबादच्या तरूणाचा मृत्यू, गोवा महामार्गावर 4 ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बुधवारी मध्यरात्री विक्रोळी-मुलुंडच्या दरम्यान भरधाव वेगात जाणा-या एका स्कोडा कारला भीषण अपघात झाला. यात कार चालक जागीच मृत्यूमुखी पडला. वरुण नायर असे मृत कार चालकाचे नाव आहे. तो औरंगाबाद शहरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, ऐरोलीजवळील उड्डाणपुलावरून वरूण नायर आपली स्कोडा गाडीने वेगाने चालला होता. मात्र, ऐरोलीवरील उड्डाणपूलावर चढताच वेगामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार उड्डाणपूलाच्या कठड्याला जोरात धडकली. वेग प्रचंड असल्याने ही कार 100 फूट अंतरापर्यंत रोडच्या कडेवरील खड्ड्यातून झाडात जाऊन पडली. या अपघातात वरूण नायरचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वरूण नायरच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता. कार गाडी पूर्णपणे चेपली होती त्यामुळे वरूणचा मृतदेह बाहेर काढता येत नव्हता. यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले व अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर वरूणचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या व वाहतूक कोंडी झाली.
मुंबई-गोवा हायववेवर 4 ठार, 28 जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या बस-ट्रक अपघातात 4 जण ठार झाले आहेत तर 28 जण जखमी झाले आहेत. अपघातातील बसमध्ये गुजरातचे लो प्रवास करीत होते व गोव्यात सुट्टी घालवून परतत होते. मात्र, बेळणे येथील उडपे येथे ट्रकने या बसला समोरासमोर जोराची धडक दिली. यात 4 जण जागीच ठार झाले तर इतर 28 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.