आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Car Dealer Asks Employee To Resign Over Dress Code

स्कर्ट घाला, नाही तर राजीनामा द्या ! कार डिलर कंपनीचे अजब फर्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलवार कमीजऐवजी स्कर्ट टॉप घालून या, अन्यथा राजीनामा द्या, असे फर्मान मुंबईतील कार डीलर कंपनीने टेलिफोन ऑपरेटरला सोडले आहे. स्कर्ट-टॉप हा कंपनीचा ड्रेसकोड आहे. ही 28 वर्षीय महिला 2010पासून कंपनीत आहे. नोकरीच्या अटींत ड्रेसकोड असल्याचे लेखी द्या, असा पवित्रा तिने घेतला. त्यावर व्यवस्थापनाने राजीनामा देण्यास सांगितले. पतीसोबत तिने पोलिसांत तक्रार दिली. मी मुस्लिम असून, कंपनीच्या ग्राहकांना खूश करण्यासाठी स्कर्ट-टॉप, जीन्स-टीशर्ट घालणार नसल्याचे तिने म्हटले आहे. दरम्यान, कर्मचा-यांना ड्रेसकोड पाळावा लागेल, असे कंपनीने म्हटले आहे. डीलर्सना याबाबत काटेकोर सूचना दिल्याचे होंडाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.