आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसच असुरक्षित: ठाणे- वाहतूक पोलिसाला फरफटत नेले, धुळे- PSI जखमी, शिर्डीत वाळू तस्‍कराचा हल्‍ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- दुचाकीस्‍वाराकडून झालेल्‍या मारहाणीत वाहतूक पोलिस कर्मचारी विलास शिंदे शहीद झाले. ही घटना ताजी असतानाच पुन्‍हा ठाण्‍यात एका वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्‍याची घटना समोर आली आहे. एका चालकाने ठाणे वाहतूक पोलिसाला फरफटत नेले आहे.
चालक आणि ठाणे वाहतूक पोलिसाचा वाद झाला. या वादानंतर संतापलेल्‍या चालकाने वाहतूक पोलिसाला फरफटत नेले. नरसिंग महापुरे असे या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. महापुरे या घटनेत जखमी झाल्‍याची माहिती आहे. तर, कारचालकाचे नाव योगेश भामरे असल्‍याची माहिती समोर आली आहे. भामरेला लोकांची चांगलाच चोप दिला असून त्‍याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

काय आहे प्रकार..
ठाण्याच्या एलबीएस रोडवर दारुच्या नशेत असलेल्या चालकाने वाहतूक पोलिसाला गाडीवर फरफटत नेले. जखमी झालेल्‍या महापुरे यांना हॉस्‍पिटमध्‍ये दाखल करण्यात आले. आरोपी योगेश भामरेला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी राँग साईडने आपली चारचाकी गाडी नेत होता. महापुरे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने नाशिकच्या दिशेने गाडी वळवली. त्‍यावेळी महापुरे गाडीसमोर आल्याने त्याने त्यांनाही गाडीसोबत फरफटत नेले. यावेळी स्थानिकांनी आरोपीला पकडून चोप दिला.
वाहतूक पोलिस विलास शिंदे बुधवारी शहीद..
23 ऑगस्ट रोजी खार एसव्ही रोडवरील पेट्रोल पंपावर डयुटीवर बजावत असताना विलास शिंदे यांनी एका दुचाकीस्वाराकडे त्याच्या गाडीची माहिती मागितली. शिंदे यांना माहिती देण्यास दुचाकीस्वाराने नकार दिला. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर संतापलेल्या दुचाकीस्वाराने शिंदे यांना मारहाण सुरु केली. तिथे असलेले एक लाकूड उचलून त्याने शिंदे यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. शिंदे रक्ताच्या थारोळयात तिथे कोसळले. ते पाहून भेदरलेला दुचाकीस्वार तिथून पसार झाला. गंभीर अवस्थेत त्यांना लिलावती हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्यात आले. बुधवारी दुपारी ते शहीद झाले.
शिंदे यांच्‍या कुटुंबियांनी घेतली राज ठाकरेंची भेट..
वाहतूक पोलिस विलास शिंदे व मुंबई पोलिसांच्‍या कुटुंबियांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. कर्तव्‍यावर असताना झालेल्‍या मारहाणीत विलास शिंदे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शिंदे यांच्‍यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यातील सर्व पोलिस असुरक्षित असून, कायद्यात बदल करण्यात यावी. तसेच पोलिसांवर हात उगारणा-यांवर कडक कारवाई व्हावी, या मागण्या घेऊन कुटुंबियांनी कृष्णकुंजवर राज यांची भेट घेतली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, धुळ्यातील PSI जखमी, शिर्डीत वाळू तस्‍कराचा हल्‍ला..
बातम्या आणखी आहेत...