Home »Maharashtra »Mumbai» Carkit Say No To Hirani

हिराणींच्या ‘पीके’त काम करण्यास ‘सर्किट’चा नकार

वृत्तसंस्था | Jan 10, 2013, 01:32 AM IST

  • हिराणींच्या ‘पीके’त काम करण्यास ‘सर्किट’चा नकार

मुंबई - राजकुमार हिराणी यांच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये खºया अर्थाने नावारूपास आलेल्या अभिनेता अर्शद वारसी याने आता मात्र हिराणी यांच्या आगामी ‘पीके’ चित्रपटात काम करण्यास चक्क नकार दिला आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत अर्शदने सांगितले की, हिराणी यांना माझ्यासोबत ‘पीके’ हा चित्रपट करायचा होता. मात्र, याचदरम्यान विशाल भारद्वाज यांच्या ‘डेढ इश्किया’ या चित्रपटांच्या तारखादेखील होत्या. मला एकाच चित्रपटाची निवड करणे बंधनकारक होते. त्यामुळे मी विशाल यांच्या चित्रपटाची निवड केली. ‘पीके’ या चित्रपटात आमिर खान, अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दुसरीकडे ‘डेढ इश्किया’मध्ये अर्शदसोबत माधुरी दीक्षित एका डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्शद सध्या ‘फस गये रे ओबामा’ फेम सुभाष कपूर यांच्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटात काम करत असून त्याच्यासोबत बोमन इराणी दिसणार आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट आहे.

2003 मध्ये हिराणी यांनी संजय दत्त आणि अर्शद वारसी यांना घेऊन ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. प्रदर्र्शनानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांना अक्षरश: डोक्यावर घेतले होते. तसेच हा चित्रपट कित्येक आठवडे बॉक्स आॅफिसवरून हटला नव्हता. यानंतर हिराणी यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा चित्रपट केला. यामध्येही अर्शदची भूमिका होती. हा चित्रपट गांधीगिरीमुळे आजही लोकांच्या स्मरणात आहे. आता मुन्नाभाई सिरीजचा तिसरा भागही लवकरच येणार असून यात संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘एलएलबी’चा प्रोमो
‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचा प्रोमो मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी सांगितले की, या चित्रपटासाठी आधी मी शाहरूखकडे विचारणा केली होती. मात्र, तारखांच्या घोळामुळे त्याला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे शेवटी मी अर्शद वारसीला या चित्रपटासाठी साइन केले. अर्शद यात एका छोट्या शहरातील वकिलाची भूमिका करत असून त्याच्यासोबत बोमण इराणी यांचीही भूमिका आहे, तर अभिनेत्रीच्या भूमिकेत अमृता राव दिसणार आहे.

Next Article

Recommended