आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cartoonist Balasaheb Thackeray And Cartoon Weekly Marmik

ही आहेत बाळासाहेबांची प्रसिद्ध व्‍यंगचित्रे, रेषांवरील हुकूमत देशभर गाजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक अग्रगण्य व्यंगचित्रकार ही ओळख राष्ट्रीय पातळीवरील कायम राहली. अनेक राजकीय घटना, प्रसंगांतील विसंगती, विरोधाभास टिपण्याच्‍या त्‍यांच्‍या शैलीने भल्‍याभल्‍यांना भुरळ घातली होती. बाळासाहेबांनी काढलेली कित्‍येक व्‍यंगचित्रे आजच्‍या समस्‍या आणि प्रसंगांशी हुबेहुब जुळतात. बाळासाहेबांची रेषांवरील कमालीची हुकूमत, व्यंगचित्राचा विषय, गाढा अभ्यास आणि तेवढीलच विलक्षण कल्पनाशक्ती या गुणांमुळे त्‍यांची व्यंगचित्रे त्याकाळी प्रचंड गाजली. बाळासाहेब ठाकरे यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्‍त या पॅकेजमध्‍ये पाहूया त्‍यांनी रेखाटलेली काही खास व्‍यंगचित्रे. सुरूवातीला एक कलाकार म्हणून बाळासाहेबांनी सामाजिक प्रश्‍नांवर व्यंगचित्रातून भाष्य करण्यास सुरुवात केली. पुढे 1950 मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले.
‘मार्मिक’चा जन्‍म
बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे व्यंगचित्रात्मक साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला होता. त्‍यानुसार त्यांनी ऑगस्ट, 1960 मध्‍ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. ‘मार्मिक’ हे नाव प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. मुंबईमध्‍ये मराठी माणसावर होणा-या अन्यायाला वाचा फोडण्‍याचे काम बाळासाहेबांच्‍या मार्मिकने केले. महाराष्ट्रात येऊन येथील लोकांबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, बाळासाहेब ठाकरे यांची खास व्‍यंगचित्रे..