आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bday: बाळासाहेब मानायचे गुरुस्थानी, आणीबाणीतही यांनी इंदिरा गांधींवर केले होते प्रहार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुणे- कार्टुन्सच्या माध्यमातून सामान्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे आणि नेत्यांवर कठोर प्रहार करणारे 'द कॉमन मॅन'चे निर्माते आर. के. लक्ष्मण यांचा आज (24 ऑक्टोबर) 95 वा जन्मदिवस आहे. देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हाही न घाबरता लक्ष्मण यांनी कार्टुनच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे विद्यामान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे कार्टुन बॅन केले होते. तरीही लक्ष्मण डगमगले नाहीत. कार्टुनच्या माध्यमातून मनातील भावना व्यक्त करीत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेदेखील लक्ष्मण यांना गुरुस्थानी मानायचे.
राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशात ओळख निर्माण झाली होती. कॉमन मॅनचे प्रश्‍न कार्टून्‍सच्‍या माध्‍यमातून शासनापर्यंत पोहचवणे हा त्‍यांच्‍या कार्टून्‍सचा विषय असायचा. 60 वर्षाहून अधिक काळ त्यांनी व्यंगचित्रकाराची भूमिका पार पाडली. सर्वसामान्‍यांचे प्रश्‍न सोडवण्‍यासाठी ते नेतृत्‍वस्‍थानी असलेल्‍या व्‍यक्तिंना टारगेट केले. मात्र खालच्‍या पातळीवर जाऊन कधी टीका केली नाही.
'टाइम्स ऑफ इंडिया' मधील त्‍यांची कार्टून्‍स हा सर्वांच्‍या चर्चेचा विषय असायचा. आणीबाणीच्या काळात त्‍यांच्‍या इंदिरा गांधी यांच्‍यावर ' इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा' अशा प्रकारचे कार्टून्‍स तयार केल्‍यामुळे इंदिरा गांधी त्‍यांच्‍यावर भडकल्‍या होत्‍या. अशा प्रकारचे कार्टून्‍स यानंतर बनवायचे नाही अशा प्रकारचा सल्ला इंदिराजीने आर. के. यांना दिला. त्‍यावेळी आर. के. यांनी इंदिरा गांधी यांना प्रतिउत्तर दिल्‍यामुळे काही काळा त्रास सहन करावा लागला होता. अणीबाणीच्‍या काळात त्‍यांनी देश सोडला आणि काही दिवसांसाठी ते मॉरिशसला स्‍थायीक झाले होते.
बाळासाहेब मानायचे गुरुस्थानी
- शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे लक्ष्मण यांना गुरुस्थानी आणि अत्यंत जवळचे मित्र मानायचे.
- दोघांनी अनेक वर्षे सोबत काम केले होते. लक्ष्मण आजारी असताना बाळासाहेब यांनी घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
पुढील स्‍लाईडवर पाहा, आर. के. यांचे आणीबाणीच्या काळातील आणि इतर कार्टून्‍स... तसेच त्यांचे काही दुर्मिळ फोटो....
बातम्या आणखी आहेत...