आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ पत्रकारावर आक्षेपार्ह टिप्पणी, नितेश राणेंविरोधात तक्रार दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र व स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. त्यांच्या विरोधात माहिम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. नितेश राणे यांनी ट्विटरवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. नितेश राणे यांनी गेल्या आठवड्यात वागळे हे मराठी पत्रकारितेचे ‘तरुण तेजपाल’ असल्याचा आरोप केला होता.