आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॉडेलचे शोषण : प्रसिद्ध चित्रपट निर्माता अडकला, कामाचे अमिष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चित्रपट निर्माता व अभिनेता अरमान कोहलीच्याविरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हा गुन्हा दया पंडित या मॉडेलने दिलेल्या तक्रारीनंतर दाखल केला आहे. कोहलीवर शिव्या देणे व गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. दयाने दिलेल्या माहितीनुसार, अरमाने आपल्या येऊ घातलेल्या नव्या चित्रपटात काम देण्यासाठी घरी बोलावले होते. जेव्हा दया घरी गेली तेव्हा त्याने तिच्याशी गैरवर्तन केले.
दया हिची तक्रार सांताक्रुज पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहे. तेथील पोलिस अधिकारी अरुण चव्हाण यांनी सांगितले की, दया जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये आली होती तेव्हा ती दारुच्या नशेत होती. त्यामुळे आम्ही तिचीही वैद्यकीय चाचणी घेतली आहे. सध्या हे प्रकरण दोघांतील आपआपसांतील संबंधातील असल्याचे दिसून येत आहे.