आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Case Filed Against Bhujabal Close Aid Tekachandani, 8 Hecter Land Grabed

भुजबळांचा निकटवर्तीय टेकचंदानीवर गुन्हा दाखल, ८ हेक्टर जमीन हडपली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - १९९५ च्या युती सरकारपासून सार्वजनिक बांधकाम विभागात वावरणारा बडा एजंट व माजी मंत्री छगन भुजबळ यांचा निकटकवर्तीय ललित टेकचंदानी व त्याच्या पाच साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल येथील अभिषेक मांगलिक यांची ८ हेक्टरवरील मोक्याची जमीन खोटी सही व बनावट कळमुख्त्यारनामा बनवून परस्पर १ कोटी ४० लाख किमतीला आपण विकत घेतल्याचे त्यांनी भासवले हाेते.

भुजबळ बांधकाम विभागाचे मंत्री असताना टेकचंदानीच या विभागाची सूत्रे हलवत असल्याची चर्चा हाेती. गेल्या २० वर्षांत या विभागातील अधिका-यांच्या बदल्या, टेंडर मिळवून देणे यासारख्या कामांमध्ये टेकचंदानीचा हातखंडा आहे. भाजप-शिवसेना सरकार आल्यानंतरही त्याचे या खात्याशी संबंध पूर्वीसारखेच असल्याचे समजते.

दिल्लीतील रहिवासी मांगलिक यांनी १४ जून २००६ राेजी तामसई (ता.पनवेल) येथे ८ हेक्टर जमीन घेतली. मात्र, २ जून २०१५ राेजी सातबारा काढत असताना त्यांना आपल्या मालकीची जमीन खरेदीखत करून विकल्याचे समाेर अाल्याने त्यांना धक्का बसला. रंजितकुमार गरीबसिंग यांना पुढे करून या जमिनीचे खोटे कुळमुख्त्यारनामा बनवून ती ललित श्याम टेकचंदानी, मुनल्ला मेहबुल्ला, कांचवाला, रेहना मुनल्ला कांचवाला, काजोल ललित टेकचंदानी यांना विकल्याचे आढळून आले. बनावट कुळमुख्त्यारनाम्यात ललित व त्याचे सर्व साथीदार हे के.ए. कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स (हेक्स काॅर्पोरेशन), ८/अे-४ वसंत पार्क, आर.सी.मार्ग, चेंबूर या कंपनीचे भागीदार असल्याची नोंद आहे. सदर खरेदीदारांनी कुळमुख्त्यारपत्र चेंबूरच्या राजेंद्र साळुंखेला दिले होते. साळुंखेने खरेदीखत हे दुय्यम निबंधक, पनवेल येथे २४ फेब्रुवारी २०१४ रोजी नोंदणी करून घेतले. ते करून घेताना बिपिन मोतीलाला मांगलिक यांनी जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार केल्याचे नमूद केलेे आहे. याबाबतीत अभिषेक मांगलिकने बंगळुरूला राहणा-या आपल्या काकांकडे चौकशी केली असताना आपण हा व्यवहारच केला नसल्याचे अभिषेकने तक्रारीत म्हटले अाहे.

पुढे वाचा.. भाजपशीही जवळीक