आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोसरी भूखंड गैरव्यवहारात एकनाथ खडसेंवर गुन्हा; पत्नीसह जावयावरही एफअारआय दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भाेसरी एमअायडीसीतील भूखंड गैरव्यवहारप्रकरणी अप्पर पाेलिस महासंचालकांच्या देखरेखीखाली चाैकशी करा, असा अादेश उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला (एसीबी) अाठ मार्च राेजी दिला. त्यानंतर एसीबीने साेमवारी पुण्यातील बंडगार्डन पाेलिस ठाण्यात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश दयाराम चाैधरी व जमिनीचे मूळ मालक अब्बास रसूलभाई उकानी, हसनैन झाेएब उकानी व इतर अाराेपी विराेधात गुन्हा दाखल केला.

भूखंडाचा बेकायदेशीर व्यवहार केल्याचा ठपका या सर्वांवर ठेवण्यात अाला अाहे. मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी या प्रकरणी अहवाल सादर करणे बंधनकारक असल्याने एक दिवस अाधी एसीबीने ही कारवाई केल्याचे मानले जाते.  

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी बंडगार्डन पाेलिसांकडे ३० मे २०१६ राेजी खडसेंविराेधात तक्रार दिली हाेती, त्यालाच फिर्याद समजून याप्रकरणाचा एसीबीने तपास करावा असा अादेश न्यायालयाने दिलेला अाहे. मात्र तत्पूर्वी स्मरणपत्रे पाठवूनही पाेलिसांकडून अापल्या तक्रार अर्जावर काेणतीच कारवाई हाेत नसल्यामुळे गावंडे यांनी जून महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती.  त्यावर बंडगार्डन पाेलिसांनी खडसे यांचे विराेधातील गुन्ह्यात तथ्य नसल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, उच्च न्यायालयाने तक्रार अर्जाच्या तपासाबाबत एफअायअार नाेंदवला नसल्याबाबत पाेलिसांवर कडक शब्दांत ताशेरे अाेढले अाहे. तसेच या प्रकरणाची सर्व शहानिशा करून न्यायालयाने अाठ मार्च राेजी माजी मंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबाविराेधात एफअायअार दाखल करून अहवाल सादर करण्याचे अादेश एसीबीला दिले हाेते. त्यानुसार न्यायालयाच्या अादेशानंतर अखेर एक महिन्याने खडसे व त्यांच्या कुटुंबीयांविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

पोलिसांची चालढकल...
पुण्याचे बांधकाम व्यावासायिक हेमंत गावंडे यांनी खडसेंविरुद्ध दिलेली तक्रारच फिर्याद समजून तपास करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले होते. मात्र खडसेंविरोधातील तक्रारीत तथ्य नसल्याचे सांगत पोलिस चालढकल करत होते. शेवटी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा नोंदवला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...