आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Case Filed Against Raj Thackeray Vandalism Toll Booth

उद्धव ठाकरेंनी मनसेच्या टोल आंदोलनाची हवा काढली, राजला म्हटले \'पावशा\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुठे आंदोलन पेटले आहे? टोल तर सुरुच आहे. असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टोल विरोधी आंदोलनाची हवा काढून टाकली आहे. महायुती सत्तेत आल्यानंतरच टोल बंद होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी राज्यसभेची उमेदवारी दाखल केल्यानंतर मातोश्रीवर येऊन उद्धव यांची भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दुसरीकडे शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या संपादकीयमधून मनेसच्या आंदोलनावर खरमरीत टीका करण्यात आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता अग्रलेखात म्हटले आहे, 'टोल’ संपवावाच लागेल. शिवसेना-भाजप त्यासाठी वचनबद्धच आहेत, पण यानिमित्ताने झोपी गेलेले जागे झाले व त्यांनी रात्रीच्या काळोखात टोलनाके फोडले. जनतेला त्यांचे ढोंग कळले आहे. राजकारणात हवशे, नवशे आणि पावशेही आहेत. मात्र त्यांच्याकडे लक्ष न दिलेलेच चांगले!
'पावशे' कोण आहेत हे समाजावून सांगताना अग्रलेखात म्हटले आहे, 'पाऊस येण्याची चाहूल ज्याप्रमाणे पावशा पक्षी देतो तशी निवडणुकांची चाहूल लागताच काही राजकीय पक्ष उगाच मर्दानगीचा आव आणतात.' मनसेच्या स्टाइलवर टीका करताना कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या बंदचे उदाहरण देऊन म्हटले आहे, 'मुंबईत एखादी टॅक्सी फोडून ‘परप्रांतीय हटाव’चा आवाज आला किंवा ‘टोलनाका’तोडीची दोनेक प्रकरणे घडली की समजावे एरवी जनतेच्या नावाने टांगा वर करून झोपलेले पक्ष जागे झाले असून त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे.'

पुढील स्लाइडमध्ये, आधी 110 केसेस सुरु आहेत त्यात दोनची भर