आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य पांचोली विरोधात वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता आदित्य पांचोली याने शेजा-याला मारहाण केल्याची तक्रार वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येमुळे आदित्य पांचोली आणि त्याचा मुलगा सुरज चर्चेत आहे. आता आदित्य पांचोलीने त्याचे शेजारी भार्गव पटेल यांना मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

19 जून रोजी झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजही पटेल यांनी पोलिसांना दिले आहे. त्यात पांचोली पटेल यांना धक्काबुक्की करताना दिसत आहे. प्रथम त्यांच्या श्रीमुखात भडकावल्यानंतर पांचोली त्यांना पुन्हा मारण्यासाठी धावून जातो. या मारहाण प्रकरणाचा वर्सोवा पोलिस तपास करीत आहेत. पांचोली यांनी शेजा-यांना मारहाण का केली याचा खुलासा अद्याप झालेला नाही.