आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Caste Certificate Issue At Maharashtra Government

जात प्रमाणपत्रे सादर करा, अन्यथा बडतर्फी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांना जात वैधता प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी 31 जुलै 2013 पर्यंतची मुदत दिली आहे. प्रमाणपत्र सादर न करू शकणार्‍या कर्मचार्‍यांना तत्काळ प्रभावाने बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती एका उच्चाधिकार्‍याने दिली.

महाराष्ट्र अनुसूचित जाती-जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय जाती आणि विशेष मागासवर्गीय जात वैधता आणि पडताळणी अध्यादेश, 2011 नुसार या वर्गवारीत मोडणार्‍या प्रत्येक सरकारी आणि निमसरकारी कर्मचार्‍याला आपले जात प्रमाणपत्र वैधतेसाठी जात पडताळणी समितीकडे सादर करावे लागते. कायद्यान्वये एखाद्या कर्मचार्‍याने मागासवर्गीय कोट्यातील नोकरीसाठी खोटे प्रमाणपत्र सादर करून अनेक वर्षे नोकरीही केल्यास त्याला तत्काळ प्रभावाने बडतर्फ करण्याची तरतूद आहे.

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या कर्मचार्‍यांना त्याच्या पूर्ततेसाठी महिनाभराची नोटीस देण्यात येईल. तरीही वैध प्रमाणपत्र सादर न करणार्‍या कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात येईल, असेही अधिकार्‍याने सांगितले.