आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Caste Validaty Divisional Committee Numbers Go On 24 Ajit Pawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जात पडताळणी विभागीय समित्यांची संख्या आता 24, अजित पवारांचा बैठकीत न‍िर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील जात पडताळणीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या 15 समित्यांची संख्या वाढवून ती 24 करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी आणि शासकीय योजनांचे लाभार्थींची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
राज्यात सध्या कार्यरत 15 समित्या कार्यरत आहेत. रायगड, सातारा, अहमदनगर, जळगाव, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ आणि भंडारा या नऊ ठिकाणी नवीन विभागीय जात पडताळणी समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास आणि इतर मागास प्रवगार्तील उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी सहा महसूल विभागात एकूण 12 वसतीगृहे (प्रत्येक विभागात मुले आणि मुलींसाठी प्रत्येकी एक वसतीगृह) बांधण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.


प्रत्येक वसतीगृह 250 क्षमतेचे असेल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र धोरण
वैद्यकीय, अभियांत्रिकी, विज्ञान आदी उच्च शिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या शासकीय निवासी शाळांमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गांसाठी तासिका शाळांवर शिक्षक नियुक्त करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र जाहीर धोरण करण्याचे ठरवले आहे. त्यास होत असलेला विलंब लक्षात घेता राज्याचे स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक धोरण तातडीने तयार करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.